Mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra

about get together, 8th aug

 

 

 

hi friends.....

 

 

 

about get together

 

date - 8th aug

Time - 2 pm

place : santoshi mandir, asha gadh

 

(asha gadh is located on dahanu javhar  road about 7 km from dahanu)

 

 

for detail communication please feel free to talk our members

 

Vasant bhasara - 9422675887

Dr. Sunil - 9860383632

Vilas - 9270516193

Sandip - 9220525706 

Maresh -9272609261

Viraj - 9224324614

Kishhor - 9970622274


 

 

AYUSH TEAM

 

 

 


--

paalghar talukyat pur

 
पालघर तालुक्यात पूर

 
     

ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातील सगळ्यांच तालुक्यांत दोन दिवस संततधार पाऊस पडत असून बहुतांश ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे पालघर तालुक्याचा गावांशी संपर्क तुटला असून, खवळलेल्या लाटांमुळे स्थानिकांच्या घरात पाणी भरले आहे. महसूल व पोलिस प्रशासनाने अशा दोनशेहून अधिक कुटुंबाना किनाऱ्यावरुन सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

गेल्या ३० तासांत पालघर-डहाणू-तलासरी-विक्रमगड जव्हार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून सुर्या, दहेरजा, वैतरणा, दुधगंगा व तानसा नद्यांना पूर आला आहे. गेल्या २४ तासात पालघरात १५७ सेमी, डहाणूत २१८.२ सेमी व तलासरीत १५३ सेमी पावसाची नांेद झाली आहे. पालघर-मनोर मार्गावरील मासवण येथे सुर्या नदीच्या पुलावरून ८ फूट पाणी जात असून मुंबई, ठाणा, भिवंडी, नाशिककडे जाणारी वाहतूक बंद पडली आहे. बोईसर औद्योगिक क्षेत्रालगतच्या सिडको, संजय नगर, महादेव नगर, धोडीपुजा, भयापाडा, भीमनगरच्या बैठ्या वसाहतींमध्ये बरेच पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

पालघरचे तहसिलदार दिलीप संखे व गट विकास अधिकारी राहुल धुम यांनी किनाऱ्यावरील दांडी गावातील कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविले असून आणखी ४० कुटुंबाना उद्या सकाळी हलविण्यात येेणार असल्याचे समजते.

डहाणू तालुक्यातील घोलवड, वाणगांव, डहाणूखाडी, वाढवण, चिंचणी, तारापुर, डहाणूदिवादांडी, चंदिका पूल या ठिकाणी पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने वाहतूक बंद पडली आहे. तसेच, बोडीर् येथील खोताची खाडी येथे धुंडीयापाडा व तरीयापाडा येथील ५० घरात पाणी शिरल्याने १३० स्थानिकांना शारदाश्रम शाळेत तर बोरींगाव येथील मोऱ्याचा पाडा येथे २५ घरात पाणी थिरल्याने ७० स्थानिकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हलविण्यात आल्याचे घोलवड पोलिस ठाण्याचे अधिकारी सुनिल वडके यांनी सांगितले.

तलासरी तालुक्यातील समुदकिनाऱ्यावरील झाई गावालाही पावसाच्या पाण्याबरोबरच समुदाच्या लाटांनी घेरले आहे. २२, २३, व २४ जुलै या तारखांना समुदाच्या उधाणचा धोका संभवत असल्याचा इशाराही सरकारने दिला आहे.
 
 

टेक केअर दोस्त


हाय...

पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून गुडघाभर साचलेल्या पाण्यात रिपरिप करत आपल्याला चिडवत राहतो...या पावसाला सरळ टांग मारायची. वीकेण्डला सॅक पाठीवर टाकायची. कॅमेरा लटकवायचा. रेनीवेअर अडकवायचं, कंपूला फोनाफोनी करायची, लोकलच्या वेळा नीट बघायच्या, नाहीतर सरळ गाडी काढायची आणि पावसाला भेटायला रानात जायचं....अस्साच प्लॅन करताय ना? पण मंडळी, या मान्सून पिकनिकपूर्वी लेट मी शेअर वन थिंग.

आमच्याच ऑफिसमधला तो ग्रुप. वेगळ्या सेक्शनमधला. पाऊस सुरू झाल्याबरोबर त्याला सलामी द्यायला सगळ्यांनी कोकणात जायचं ठरलं. रात्रीचा प्रवास करुन सकाळी सगळे तिथं पोहोचले. नदीचं खळाळतं पाणी आणि हिरवाकंच निसर्ग यांनी वेड लावलं सगळ्यांना. कुणाचीही वाट न पाहता तो तर धावलाच पाण्याकडे. कपडे काढून थेट पाण्यात. भय नव्हतंच , कारण तो पट्टीचा पोहणारा. उडी मारली ती थेट तळाशीच. वर्षानुवर्षांचा गाळ पोटात साठवलेल्या नदीने त्यालाही अलगद पोटात घेतलं. हातपाय हलवले असतील खूप. वर यायची धडपडही केली असेल, पण खोल रुतत गेला तो. मित्र धावले. कुणी पॅनिक होऊन उड्या मारल्या नाहीत हे नशीब. गावकऱ्यांना बोलावलं. बराच वेळ शोधाशोध केली. सापडला नाहीच. रात्री शोध थांबवावा लागला. दुसऱ्या दिवशी सापडला, डोळे माशंनी खाल्ले होते...खूप भेसूर दिसत होता म्हणे...आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. चोवीस वर्षांचा.

पाऊस वाढेल, तसतशा बातम्या येत राहतील. आपण वाचू. माहितीचं कुणी असेल तर तात्पुरते हळहळू. पाच मिनिटं अस्वस्थ होऊ आणि सोडून देऊ. आपली पिकनिक प्लॅन करताना हे कुणाच्या ध्यानातही राहणार नाही.

पाण्याचं आदिम आकर्षण असतंच आपल्या सगळ्यांमध्ये. कदाचित आपण पाण्यामधून उत्क्रांत झालो आहोत म्हणून असेल, जन्माला येण्यापूवीर् नऊ महिने पाण्यातच वाढलो म्हणून असेल किंवा शरीरात नव्वद टक्के पाणी घेऊन वावरतो म्हणून असेल. या आकर्षणातूनच पाण्याकडे ओढले जातो आपण. हिरव्या डोंगरावरून फेसाळत कोसळणाऱ्या शुभ्र धबधब्यांखाली भिजणं, चिंब पावसांत समुदाच्या लाटांशी मस्ती करणं, तुडुंब वाहणाऱ्या खळाळत्या गढूळ नदीला आव्हान देणं...हे सगळं उसळत्या तरुणाईला खुणावणारं असतंच, पण बहुतेक वेळा धबधब्यांपर्यंत पोहोचेपर्यंत कडेकपारीतून चालताना सैल झालेली एखादी दरड तुमच्यासह पात्रात कोसळू शकते. खूपदा पाणी दिसतं शांत पण अंदाजापेक्षा ते प्रचंड खोल असतं. कुठे याच शांत पाण्याखालचे भोवरे अशा वेगाने खाली खेचतात की परत नखही दृष्टीला पडू नये. या दिवसांत समुद्रही मित्र राहत नाही, अनोळखी होऊन जातो. जीवदायिनी नदी जीवघेणी होते. कितीही पट्टीचे पोहणारे असाल तरी अशावेळी फालतू आत्मविश्वास न ठेवलेलाच बरा. ज्या ठिकाणाविषयी काहीही माहिती नाही अशा ठिकाणी जीवघेणं साहस करायलाच पाहिजे का? पुष्कळदा किनाऱ्यांवर ते ठिकाण पोहण्यासाठी किती धोकादायक आहे. गेल्या काही वर्षांत किती लोकांनी प्राण गमावले, याची आकडेवारी लिहिलेला बोर्ड असतो, पण त्याच्याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष करतो आपण. बरं आपण निवडलेली ठिकाणंही इतकी आतल्या भागात असतात की आराडाओरडा करूनही मदत मिळण्याची शक्यता नसते. मिळाली तरी पुष्कळदा मृतदेह वर काढण्याच्या वेळी ती पोहचते.

आणखी एक गोष्ट. ट्रीप प्लॅन करताना ड्रिंक्सचा क्रेट कुणी आणायचा हे पण ठरतं का तुमच्यात? एंजॉय करण्याच्या व्याख्येत हे असू नये असं म्हणून तुमचा मूड खराब करणार नाही. पण दारू पिणं ही चार भिंतींच्या आत बसून करायची गोष्ट आहे असं नाही वाटत तुम्हाला? मस्त पाऊस पडतोय. सोबत जीवलग दोस्तमंडळी आहेत. निसर्ग त्याचं वैभव तुमच्यासमोर खुलं करून बसलाय. ही नशा पुरेशी नाहीये? पावसाळी सहलीसाठी आपल्यासारखीच कुटुंबही बाहेर पडतात. आपण आरडा ओरडा करत नशेत अचकटविचकट बोलत असतो, तेव्हा बायका, लहान मुलं, वयस्क माणसं यांनी तिथं मिनिटभरही थांबू नये असा माहौल असतो. कमरेला नावापुरतं वस्त्रं. हातात बाटली नाहीतर कॅन, अचकट विचकट अंगविक्षेप, अर्वाच्य भाषा हेच तरुणाईचं इंप्रेशन व्हावं असं वाटतं तुम्हाला? खूपदा किल्ल्यांवर जातो आपण पाऊस एंजॉय करायला. इतिहास घडवायला आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं असतं तिथं बाटलीतून हिंदकळणारी दारू सांडायची? 'हर हर महादेव'च्या गर्जना झाल्या तिथं चिअर्सचा घोष करायचा?... जस्ट थिंक फ्रेंड्स. अशा तरंगत्या अवस्थेतच अपघातांची शक्यता कैक पटीने वाढते. तासाभराची कैफ आयुष्यातून उठवू शकतो. तेव्हा भान विसरून एंजॉय करू या पण बेभान नाही व्हायचं हेही ठरवू या.

आयुष्य इतकं स्वस्त नसतं दोस्त! अशा सहलीतच नव्हे तर नेहमीच हे डोक्यात असायला हवं. लोकलच्या गर्दीत एका हाताने लोंबकळताना, हेल्मेट शिवाय सुसाट बाइक हाकताना, एक्स्प्रेस वेवरून जाताना स्पीडोमीटरच्या काट्याला थकवताना...नेहमीच. आई वडिलांचा जीव असतो तुमच्यात. कुणीतरी जन्मोजन्मीची गाठ मारून आयुष्य जोडलेलं असतं तुमच्याशी. मित्रांच्या हृदयात जागा असते तुमची, डोळे तुमच्या वाटेवर अंथरून 'पपा काय आणलं', म्हणत चिमुकले हात पसरून कुणीतरी वाट बघत असतं तुमची. तुम्ही पाहिलेलं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न अर्ध्या वाटेवर तुमच्या प्रतीक्षेत असतं... सो बी केअरफुल.

नाऊ प्लान आऊट द थिंग अँड एन्जॉय . मग कुठे जाताय या वीकेण्डला? कळवा.

हॅव अ हॅपी अॅण्ड सेफ मॉन्सून पिकनिक. टेक केअर दोस्त!

आदिवासींचा वऱ्हाड मोर्चा


- मुंबई टाइम्स टीम, ठाणे


आदिवासींच्या प्रथा न जाणून घेता अप्पर आयुक्त कार्यालयाने नवविवाहितांना कन्यादान योजनेचे पैसे नाकारले आहेत.

आदिवासी समाजात अनेकांना लग्नाआधी मुलं होतात. परंतु, तिथल्या पद्घती न जाणून घेता एसी कार्यालयात बसून नियम ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे आदिवासी समाजातल्या ४७० जोडप्यांना कन्यादान योजनेचे पैसे मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे संतापलेल्या या आदिवासींचं वऱ्हाड मंगळवारी ठाण्यातील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयावर धडकलं. एक महिन्याच्या आत सरकारी नियम बदलून अनुदान देण्याचं आश्वासन राज्याचे सचिव मीनाकुमार यांनी फोनवरुन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

सामुहिक विवाहातील जोडप्यांना सरकारच्या कन्यादान योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचं अनुदान दिलं जाते. २९ मे ०९ रोजी अशाच ४७० आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा डहाणू इथे झाला. परंतु, या जोडप्यांना लग्नाआधीच मुलं असल्याचं सांगून कन्यादान योजनेचे पैसे त्यांना देता येणार नाही, असं आदिवासी विकास विभागाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे हे आदिवासी संतापले.

या समाजातील बहुसंख्य जण दारिद्यामुळे लग्न न करताच एकमेकांच्या परवानगीने एकत्र संसार करतात. अनेकदा तर मुले मोठी झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांचं लग्न लावून देतात. अशी प्रथा वर्षानुवर्षं सुरू आहे. पण, या प्रथा सरकारी अधिकाऱ्यांना माहीत नसल्याने असा तिढा निर्माण होत असल्याचं श्रामजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितलं. त्यामुळे हा मोर्चा काढावा लागल्याचं ते म्हणाले. सरकारने आपलं धोरण बदलून सामुहिक विवाहातील आदिवासी दाम्पत्यांना अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. महिन्याभरात हा तिढा सोडवण्याचं आश्वासन राज्याच्या सचिवांनी दिलं आहे. तोपर्यंत न्याय न मिळाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा पंडीत यांनी दिला आहे.

career path by prof. vijay navale & mahesh narake

there is life beyond dot com, do you want to join??

Hi friends…
Just sending mails/sms is not our aim, its just medium for introduction & thought sharing.
 
 
our main community (peoples) are far away from internet/mail etc.......
 
 but to meet peoples from different locations & have better communication we created online communities. So we can have communication among us....
 
 
But actual our area & peoples are inaccessible from net, so there are some members who presently working with peoples at our villages (I mean Dahanu area)....
 
with the request of some members we are planning to arrange AYUSH picnic cum get together.
 
 
What do you think?
 
Planed agenda for get together
1.       Introduction to all members
2.       individual opinions
3.       AYUSH vision
4.       Experience share by members.
5.       plan for coming activities
6.       Picnic
 
First we will see the response then we will finalize the things
 
please answer the folowing questions. & send us back
 

Hi friends

Just sending mails/sms is not our work, its just medium for introduction & thought sharing. our main community (peoples) are far away from internet/mail etc. but to meet peoples from different locations & have better communication we created online communities. So we can have communication among us.

But actual our area & peoples are inaccessible from net, so there are some members who presently working with peoples at our villages (I mean Dahanu area)

 

 

with the request of some members we are planning to arrange AYUSH picnic cum get together.

What do you think?

Planed agenda for get together

1.       Introduction to all members

2.       individual opinions

3.       AYUSH vision

4.       Experience share by members.

5.       plan for coming activities

6.       Picnic

 

First we will see the response then we can finalize the things

Is get together in needed?

1.       yes

2.       no

Are you available/interested for get together?

1.       yes

2.       no

3.        

select date for get together

1.       7th aug

2.       8th aug.

 

Select spot for get together

1.        Temples

A.       Mahalaxmi Temple, mahalaxmi

B.       Santoshi Temple, ashagadh

C.       Sapta shrungi mandir, sarani

D.       Maruti mandir, waghadi

E.        Suggest if any……

2.        Mountain & treacking

A.       Mahalaxmi gadh

B.       Gambhir gadh,

C.       Ashesri gadh

D.       Suggest if any……

3.        Picnic spots

A.       Dhamani Damp, dha,mani

B.       Kavadas damp, suryanagar

C.       Bhimbandh, surya nadi, waghadi

D.       Surya nadi, kasa

E.        Surya nadi, urse

F.        Suggest if any……

4.        non picnic spots

A.       Kasa school

B.       Suggest if any……

 

 

 

 Please send your opinions. So we can arrange accordingly

  
 waiting for your valuable responce.
 
 
 
Thanks & regards
AYUSH TEAM
http://adivasiyuva.blogspot.com/
adiyuva@gmail.com
 

want to become new age Adivasi?

 
 
 आयुष हे आपल्या गावा कडील उच्च शिक्षित तरुण एकत्र येवून बनवलेले एक व्यास पीठ आहे,
आम्ही आहोत नव्या युगातील आदिवासी जे कोणत्याही कुबड्या शिवाय इत्तर समजा सोबत स्पर्धा करू शकतो, आम्हाला आहे आत्मविश्वास कि आज आणि उद्या आपलाच आहे. आज जे जे नवीन तंत्रज्ञान येत आहे ते आम्ही लगेच अवगत करतोय, आम्ही शिंक्षण फक्त डिग्री घेण्या साठी नाही घेत त्याचा उपयोग करून आम्ही आमचे जीवन अधिक सुखकर बनवायचा प्रयत्न करतोय. आम्ही जे आमच्या मनाला पटेल तेच करतो, आम्ही कुणावरही अवलंबून नाहीयेत, आम्ही स्वतंत्र आहेत, कुणीही आमच्यात ढवळा ढवळ केलेली आम्हाला नाही चालत, आम्ही इथे असलेले प्रत्येक जन आमच्या आमच्या क्षेत्रतिल नामांकित अशे म्हणवले जातो, आम्हाला आमच्या सारखेच आणखीन अशीच फौज तयार करायची आहे जे उद्याच्या जगात आणखीन तळपू शकतील आणि आदिवासी समाज काय करू शकतो हे जगाला दाखवून देतील.
तुम्ही कसला विचार करताय? बनणार तुम्ही पण आमचा हिस्सा......बनणार तुम्ही पण या नव्या युगातील आदिवासी?
मग वाट कसली बघताय चला आयुष सोबत!

 


AYUSHonline

AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in

AYUSH - warli artsists at "adishilp - 2009" @hyderabad

updation in progress!

our blogs

Loading...

apali prerana