Mahalaxmi yatra

Mahalaxmi yatra
Showing posts with label avantar vachan. Show all posts
Showing posts with label avantar vachan. Show all posts

सुसरी धरण विरोधी संघर्ष समिती


सुसरी धरण विरोधी संघर्ष समिती
सुसरी नदीवर धरण होऊ देणार नाही, होवू देणार नाही
जाहीर सभा
ठिकाण कासा केंद्र दिनांक ९ ओक्ट २०११ रोजी सकाळी १० वाजता
सुसरी नदीवर नियोजित धरण प्रस्थावित आहे. या धारणा मुळे मौजे रानशेत, आवढाणी, महालक्ष्मी, धानिवरी , दहीगाव, ओसुर, असरविरा, नवनाथ आणि गनेशबाग (रानशेत) येथील आदिवासींच्या जमिनी व वनजमिनीचे सुमारे १००० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. या धरणातील ५४ दश लक्ष घनमीटर पाणी पाईप लाईन द्वारे वसई, विरार व नवघर माणिकपूर व नालासोपाऱ्याला नेण्यात येणार आहे. या धरणाला आमचा प्रखर विरोध आहे. आजवर अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, भातसा सारख्या प्रकल्प द्वारा मुंबई ला पाणी नेण्यात येऊन ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील पाण्याची लुट करण्यात आलेली असून तेथील प्रकल्प ग्रास्तांचे पुनवर्सन झालेले नाही आणि आता मुंबई उपनगरे या भागात राहिलेल्या पाण्याची साधने हडप करू पाहत आहे. यातून आदिवासी साठी काहीही शिल्लक राहणार नाही.
म्हणूनच आतापर्यंत झाले इतके पुरे झाले, असे सरकारला ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. या पुढे आदिवासी नियोजनहित नागरीकरणाचा बोजा सहन करणार नाही. दूरवर आदिवासी भागात धरण बांधण्या एवजी वसई तालुक्यात असलेल्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर करायला हवा. सिडकोने या साठी कामन, खोळ्सा पाडा, उसगाव, सातिवली, इत्यादी जागा सुचविल्या असून या ठिकाणच्या पाण्याच्या स्त्रोताचा वापर केला गेल्यास. दर दिवशी १२४ एम एल डी एव्हडे पाणी उपलब्ध होवू शकेल असे म्हटले आहे. सुसरी धरणात मिळणाऱ्या पाण्या पेक्षा हे मिळणारे पाणी किती तरी पटीने अधिक असेल या खेरीज पाईप लाईन तसेच बांधकाम खर्चाचीही बचत होवू शकेल. मात्र ठेकेदारांच्या लॉबीला बळी पडत सरकारने या सुचणे कडे दुर्लक्ष केले आहे. आमच्या भागातील काही राजकारणी लोकांनी आदिवासी कल्याणाचा विचार करण्या एवजी या धरणाचे समर्थन करत स्वतःची तुंबडी भरण्याच्या उद्देशाने मागे लागले आहेत.
आमच्या नद्याचे पाणी आमच्या मालकीचे आहे त्याच्या वापरावर आमचा अधिकार आहे आम्हालाच जर पिण्या साठी पाणी नाही तर आम्ही येथील पाणी वसई विरार ला का पाठवावे ? आणि त्यात तर शहराच्या मागण्या रोज वाढत आहेत. तसेच शहरी भागात दर माणसी पाण्याचा वापरही जास्त केला जातो. शहराच्या नवीन वसाहतींच्या गरजा भागवण्य साठी अधिका अधिक धरणे बांधली जातील. वसई विरार मधली बिल्डर लॉबीने चालविल्या नियोजनशून्य आणि अनिर्बंधित वाढीमुळे येथे पाण्याची कमतरता भासत राहणार आहे. सूर्या प्रकल्पाचे पाणी आदिवासींची शेती फुलाविन्या साठी दिले जाणार होते परंतु ठेकेदारांनी पद्धतशीर पणे वसई विरार सारख्या योजना मधून हे पाणी अन्यत्र कसे वळवता येयील हे काम केले आहे. आदिवासी भागाचे वसाहतीकरण आणि त्यांचे पाणी इत्तर साधनांनी लुट या पुढे थांबवा असे सरकारला सांगण्यासाठी कासा येथे एकत्र जमायचे आहे.
सुसरी धरण विरोध संघर्ष समिती
अध्यक्ष : श्री नरेश हाल्या बोलाडा
उपधक्ष्य : श्री चंदू सोनू वरठा
सचिव : श्री देविदास नंदकुमार तल्हा
खजिनदार : श्री सुरेश बाबू कडू

टेक केअर दोस्त


हाय...

पाऊस मुक्कामी आलाय! पण काही म्हणा, आपल्या शहरांतल्या पावसाला गर्दीचा एक तक्रारखोर आवाज असतो. इथे तो भेटतो तेव्हा लेट झालेल्या ट्रेनच्या गर्दीत शिव्या खात असतो किंवा रस्ते तुंबवून गुडघाभर साचलेल्या पाण्यात रिपरिप करत आपल्याला चिडवत राहतो...या पावसाला सरळ टांग मारायची. वीकेण्डला सॅक पाठीवर टाकायची. कॅमेरा लटकवायचा. रेनीवेअर अडकवायचं, कंपूला फोनाफोनी करायची, लोकलच्या वेळा नीट बघायच्या, नाहीतर सरळ गाडी काढायची आणि पावसाला भेटायला रानात जायचं....अस्साच प्लॅन करताय ना? पण मंडळी, या मान्सून पिकनिकपूर्वी लेट मी शेअर वन थिंग.

आमच्याच ऑफिसमधला तो ग्रुप. वेगळ्या सेक्शनमधला. पाऊस सुरू झाल्याबरोबर त्याला सलामी द्यायला सगळ्यांनी कोकणात जायचं ठरलं. रात्रीचा प्रवास करुन सकाळी सगळे तिथं पोहोचले. नदीचं खळाळतं पाणी आणि हिरवाकंच निसर्ग यांनी वेड लावलं सगळ्यांना. कुणाचीही वाट न पाहता तो तर धावलाच पाण्याकडे. कपडे काढून थेट पाण्यात. भय नव्हतंच , कारण तो पट्टीचा पोहणारा. उडी मारली ती थेट तळाशीच. वर्षानुवर्षांचा गाळ पोटात साठवलेल्या नदीने त्यालाही अलगद पोटात घेतलं. हातपाय हलवले असतील खूप. वर यायची धडपडही केली असेल, पण खोल रुतत गेला तो. मित्र धावले. कुणी पॅनिक होऊन उड्या मारल्या नाहीत हे नशीब. गावकऱ्यांना बोलावलं. बराच वेळ शोधाशोध केली. सापडला नाहीच. रात्री शोध थांबवावा लागला. दुसऱ्या दिवशी सापडला, डोळे माशंनी खाल्ले होते...खूप भेसूर दिसत होता म्हणे...आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. चोवीस वर्षांचा.

पाऊस वाढेल, तसतशा बातम्या येत राहतील. आपण वाचू. माहितीचं कुणी असेल तर तात्पुरते हळहळू. पाच मिनिटं अस्वस्थ होऊ आणि सोडून देऊ. आपली पिकनिक प्लॅन करताना हे कुणाच्या ध्यानातही राहणार नाही.

पाण्याचं आदिम आकर्षण असतंच आपल्या सगळ्यांमध्ये. कदाचित आपण पाण्यामधून उत्क्रांत झालो आहोत म्हणून असेल, जन्माला येण्यापूवीर् नऊ महिने पाण्यातच वाढलो म्हणून असेल किंवा शरीरात नव्वद टक्के पाणी घेऊन वावरतो म्हणून असेल. या आकर्षणातूनच पाण्याकडे ओढले जातो आपण. हिरव्या डोंगरावरून फेसाळत कोसळणाऱ्या शुभ्र धबधब्यांखाली भिजणं, चिंब पावसांत समुदाच्या लाटांशी मस्ती करणं, तुडुंब वाहणाऱ्या खळाळत्या गढूळ नदीला आव्हान देणं...हे सगळं उसळत्या तरुणाईला खुणावणारं असतंच, पण बहुतेक वेळा धबधब्यांपर्यंत पोहोचेपर्यंत कडेकपारीतून चालताना सैल झालेली एखादी दरड तुमच्यासह पात्रात कोसळू शकते. खूपदा पाणी दिसतं शांत पण अंदाजापेक्षा ते प्रचंड खोल असतं. कुठे याच शांत पाण्याखालचे भोवरे अशा वेगाने खाली खेचतात की परत नखही दृष्टीला पडू नये. या दिवसांत समुद्रही मित्र राहत नाही, अनोळखी होऊन जातो. जीवदायिनी नदी जीवघेणी होते. कितीही पट्टीचे पोहणारे असाल तरी अशावेळी फालतू आत्मविश्वास न ठेवलेलाच बरा. ज्या ठिकाणाविषयी काहीही माहिती नाही अशा ठिकाणी जीवघेणं साहस करायलाच पाहिजे का? पुष्कळदा किनाऱ्यांवर ते ठिकाण पोहण्यासाठी किती धोकादायक आहे. गेल्या काही वर्षांत किती लोकांनी प्राण गमावले, याची आकडेवारी लिहिलेला बोर्ड असतो, पण त्याच्याकडेही सोयीस्कर दुर्लक्ष करतो आपण. बरं आपण निवडलेली ठिकाणंही इतकी आतल्या भागात असतात की आराडाओरडा करूनही मदत मिळण्याची शक्यता नसते. मिळाली तरी पुष्कळदा मृतदेह वर काढण्याच्या वेळी ती पोहचते.

आणखी एक गोष्ट. ट्रीप प्लॅन करताना ड्रिंक्सचा क्रेट कुणी आणायचा हे पण ठरतं का तुमच्यात? एंजॉय करण्याच्या व्याख्येत हे असू नये असं म्हणून तुमचा मूड खराब करणार नाही. पण दारू पिणं ही चार भिंतींच्या आत बसून करायची गोष्ट आहे असं नाही वाटत तुम्हाला? मस्त पाऊस पडतोय. सोबत जीवलग दोस्तमंडळी आहेत. निसर्ग त्याचं वैभव तुमच्यासमोर खुलं करून बसलाय. ही नशा पुरेशी नाहीये? पावसाळी सहलीसाठी आपल्यासारखीच कुटुंबही बाहेर पडतात. आपण आरडा ओरडा करत नशेत अचकटविचकट बोलत असतो, तेव्हा बायका, लहान मुलं, वयस्क माणसं यांनी तिथं मिनिटभरही थांबू नये असा माहौल असतो. कमरेला नावापुरतं वस्त्रं. हातात बाटली नाहीतर कॅन, अचकट विचकट अंगविक्षेप, अर्वाच्य भाषा हेच तरुणाईचं इंप्रेशन व्हावं असं वाटतं तुम्हाला? खूपदा किल्ल्यांवर जातो आपण पाऊस एंजॉय करायला. इतिहास घडवायला आपल्या पूर्वजांनी रक्त सांडलेलं असतं तिथं बाटलीतून हिंदकळणारी दारू सांडायची? 'हर हर महादेव'च्या गर्जना झाल्या तिथं चिअर्सचा घोष करायचा?... जस्ट थिंक फ्रेंड्स. अशा तरंगत्या अवस्थेतच अपघातांची शक्यता कैक पटीने वाढते. तासाभराची कैफ आयुष्यातून उठवू शकतो. तेव्हा भान विसरून एंजॉय करू या पण बेभान नाही व्हायचं हेही ठरवू या.

आयुष्य इतकं स्वस्त नसतं दोस्त! अशा सहलीतच नव्हे तर नेहमीच हे डोक्यात असायला हवं. लोकलच्या गर्दीत एका हाताने लोंबकळताना, हेल्मेट शिवाय सुसाट बाइक हाकताना, एक्स्प्रेस वेवरून जाताना स्पीडोमीटरच्या काट्याला थकवताना...नेहमीच. आई वडिलांचा जीव असतो तुमच्यात. कुणीतरी जन्मोजन्मीची गाठ मारून आयुष्य जोडलेलं असतं तुमच्याशी. मित्रांच्या हृदयात जागा असते तुमची, डोळे तुमच्या वाटेवर अंथरून 'पपा काय आणलं', म्हणत चिमुकले हात पसरून कुणीतरी वाट बघत असतं तुमची. तुम्ही पाहिलेलं आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न अर्ध्या वाटेवर तुमच्या प्रतीक्षेत असतं... सो बी केअरफुल.

नाऊ प्लान आऊट द थिंग अँड एन्जॉय . मग कुठे जाताय या वीकेण्डला? कळवा.

हॅव अ हॅपी अॅण्ड सेफ मॉन्सून पिकनिक. टेक केअर दोस्त!

विभाजन केव्हा?

मुंबई नावाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यापारी बेटाच्या कवेत, अवघ्या ४० किमी अंतरावर वसलेल्या ठाणे जिल्ह्याचा
विकास झाला आहे का, असा सवाल केल्यास शहरी भागातली मंडळी माना डोलावतील. मात्र, हा जिल्हा किती मागासलेला आहे याचे विदारक चित्र जिल्ह्यातील खेडी आणि अदिवासीपाड्यांवर दिसते. खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर जिल्ह्याचे विभाजन करणे अत्यावश्यक असल्याचे वारंवार सांगितले जाते. निवडणुका आल्या की जिल्हा विभाजनाचे पडघमही वाजू लागतात. मात्र, गेल्या १० वर्षात अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्चे निघाले तरी ही मागणी मार्गी लागलेली नाही. जिल्हा विभाजनाच्या प्रश्नावर संदीप शिंदे यांनी टाकलेला हा दृष्टिक्षेप.

.........

जिल्ह्यातील प्रशासकीय रचना

महाराष्ट्र राज्य सहा विभागांमध्ये विभागलेले असून त्यातील कोकण विभागात ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड, कल्याण आणि उल्हासनगर असे १३ तालुके जिल्ह्यात आहेत. जिल्हा स्तरावर कलेक्टर तर तालुका स्तरावर तहसिलदार प्रमुख आहेत. ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील अधिकाऱ्यांची फौज तैनात आहे. तर, शहरांच्या विकासाची धुरा महापालिकांवर सोपविण्यात आली आहे.

विभाजन कशासाठी?

- सागरी, ग्रामीण आणि शहरी अशा तीन भागांमध्ये हा जिल्हा विभागलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या मच्छिमारांचे प्रश्न वेगळे, अदिवासींच्या समस्या वेगळ्या आणि शहरी भागाच्या मागण्या वेगळ्या असतात. जिल्ह्यातल्या योजना ठरविताना त्याचा सारासार विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये नेहमीच अन्याय झाल्याची भावना असते.

- जिल्ह्याचे मुख्यालय ठाणे शहरात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि मुख्य सरकारी कार्यालये येथेच आहेत. कोणतेही छोटे मोठे काम असले तरी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या जनतेला ठाणे शहरात धाव घ्यावी लागते. एका दिवसात काम झाले नाही तर पुन्हा हेलपाटे ठरलेले आहेतच. त्यात वेळ, पैसा आणि श्रम याचा अपव्यय होत असून गोरगरीब जनता हतबल झाली आहे.

* जिल्हा मुख्यालयापासून डहाणु १२५ किमी तर जव्हार १०० किमी अंतरावर आहे. वरिष्ठ सरकारी अधिकारी अभावानेच या भागांमधील गावांमध्ये जातात. वरिष्ठ अधिकारी कागदोपत्रीच इथला कारभार पाहतात. त्यामुळे स्थानिक अधिकारीदेखील अत्यंत बेजबाबदारपणे कारभार हाकतात. त्याचा विकासावर विपरीत परिणाम झाला आहे.

ठ्ठ जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर नविन जिल्ह्यासाठी नवा कलेक्टर, नवे पोलिस अधिक्षक आणि सर्व शासकीय यंत्रणा उभारली जाते. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या कामाचे विभाजन होऊन छोट्या भागाच्या विकास अधिक प्रभावीपणे करणे शक्य होईल.

* विभाजनानंतर दारिद्य रेषेखालील जनता आणि आदिवासींसाठी केंद आणि राज्य सरकारच्या शेकडो योजना त्या लोकांपर्यंत पोहोचविणे सुकर होणार आहे.

* जिल्ह्यातील ज्या भागातून रेल्वेमार्ग जातात त्या भोवतालच्या भागाचा विकास झाला आहे. मात्र, रेल्वेचे नेटवर्क नसलेला भाग मागासलेला आहे. डहाणू-नाशिक रेल्वे मार्ग झाल्यास या भागाचाही विकास होऊ शकतो. या रेल्वेमार्गास माजी खासदार चिंतामण वनगा यांनी लोकसभेतून मंजुरी मिळवली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हे कामही सुरू झालेले नाही.

* ठाणे शहर, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, वसई या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाले असून या भागातील १० एमआयडीसींमुळे हजारो लोकांना त्यात रोजगार उपलब्ध झाला आहे. केमिकल, ऑटोमोबाईल, फार्मा, प्लास्टिक, आणि कलर्स तयार करणाऱ्या कंपन्या या भागांमध्ये आहेत. जिल्ह्यात सुमारे ११ हजार लघु उद्योग तर १ हजार ५४८ मोठे उद्योग आहेत. जव्हार आणि वाडा येथे २ को-ऑप इंडस्ट्रिअल इस्टेट आणि काही कंपन्या आहेत. मात्र, तलासरी, मोखाडा, डहाणू, पालघर हा भाग औद्योगिकीकरणात मागासलेला असून नोकरीधंद्यासाठी इथल्या लोकांना आजही कित्येक कोस दूर यावे लागते.

कसे व्हावे जिल्ह्याचे विभाजन?

क्षेत्रफळानुसार देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या ठाणे जिल्ह्याचे शहरी आणि ग्रामीण अशा दोन विभागात विभाजन करावे अशी मागणी आहे. जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका म्हणजेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर, अंबरनाथ, बदलापूर, वसई, मुरबाड या भागांचा एक जिल्हा असावा. तर वाडा, शहापूर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, पालघर, डहाणु आणि तलासरी या मागास भागांचा दुसरा जिल्हा आसावा. शहरी, सागरी आणि डोंगरी अशा तीन जिल्ह्यांत ठाण्याचे विभाजन व्हावे अशीही काही मंडळींची मागणी आहे. कृषी मंत्री शरद पवार यांनीही दहा वर्षांपूवीर् ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज व्यक्त केली होती.

अडथळे

* जिल्ह्याचे विभाजन करून सर्व शासकीय यंत्रणा उभारण्यासाठी किमान ३०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. ठाण्याबरोबरत नागपूर आणि अहमदनगर जिल्ह्यांचेही विभाजन करावे अशी मागणी आहे. एका जिल्ह्याचे विभाजन केले की दुसऱ्या जिल्ह्यातील आंदोलने तीव्र होणार तसेच तिन्ही जिल्ह््यांच्या विभाजनाचा एकत्रित निर्णय घेतला तर सुमारे एक हजार कोटींचा निधी आणि अधिकाऱ्यांची फौज उभी करणे राज्य सरकारच्या आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे विभाजनाचा प्रश्न चिघळला आहे.

* जिल्ह्याच्या विभाजन कराण्याचा विषय निघाला की नव्या जिल्ह्याचे मुख्यालय जव्हारला उभारायचे की डहाणुला याव रून वाद सुरू होतो.

* जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही काळाची गरज आहे यावर एकमत असले तरी राजकीय नेत्यांची अनास्था विभाजनाच्या मागणीची तड लावू शकलेली नाही. केवळ निवडणुका तोंडावर आल्या की विभाजनासाठी आंदोलनाचे हत्यार उगारणारे राजकीय पक्ष या मागणीबाबत किती प्रामाणिक आहेत हा संशोधनाचा विषय आहे.

* या जिल्ह्यातून १३ आमदार आणि दोन खासदार निवडून जातात. मात्र, त्यांच्यातही या मागणीबाबत एकवाक्यता दिसत नाही.

.......

योजनांचा पैसा जातो कुठे?

ठाणे जिल्हा हा भौगोलिक आणि सामाजिक स्तर लक्षात घेता आदिवासी, ग्रामीण आणि शहरी अशा तीन स्तरांत विभागला गेला आहे. १५ तालुक्यांपैकी पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, शहापूर, वाडा, विक्रमगड हे आठ आदिवासी तालुके म्हणुन ओळखले जातात. आदिवासींच्या विकासासाठी इथे दरवषीर् शंभर ते सव्वाशे कोटी रुपये खर्च केले जातात. मात्र, त्या अदिवासींच्या घरापर्यंत ना रस्ते पोहचले, ना वीज पोहचली ना पाणी. शिक्षण व्यवस्थेत सावळा गोंधळ असल्याने इथल्या अशिक्षित तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. अदिवासी हा विकासाचा केंदबिंदू मानून जिल्हात तीनशेच्या आसपास योजना राबविल्या जातात. या योजनांच्या अमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी आदिवासी विभागाचे स्वतंत्र कार्यालय आहे. मात्र, विकासासाठी येणाऱ्या पैशातून हे कार्यालयच आपल्या पोतड्या भरत असून गोरगरीब जनता मात्र आजही पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करीत आहे.

दुर्गम भागांत 'ज्ञान'वैभव!



दहावीच्या परीक्षेत यंदा ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ५९ सरकारी माध्यमिक आश्रम शाळांपैकी आठ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. यामुळे शाळांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू तालुक्यांत २१६ माध्यामिक शाळा असून यात ५९ सरकारी आश्रमशाळांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यातील अडोशी, गोंडे बुदुक, कोरेगांव तसेच जव्हार येथील कुपोषित बालकांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वांगणी, विनवल, देहेरे तसेच, विक्रमगड येथील कोन्हे, वाडा तालुक्यातील एक अशा एकूण आठ सरकारी आश्रमशाळांनी १०० टक्के यश मिळविले आहे.

तीन-चार वषेर् या आश्रमशाळांत दहावीचे निकाल शून्य ते २० टक्केच लागत होते. त्यामुळे, कोट्यवधी रुपये खर्चून सरकार आदिवासी मुलांना शिक्षण देत असूनही त्याचा पुरेसा लाभ आदिवासींना मिळत नाही; केवळ कागदी घोडे नाचवले जातात, अशी ओरड होत होती. यंदा मात्र चित्र बदलले. केवळ पाच टक्के शाळांचा निकाल ५० टक्यांच्या खाली आला आहे. त्यातही डहाणू तालुक्यातील धामणगाव येथील आश्रम शाळेचा निकाल २२. ७२ टक्के व रानकोळ येथील आश्रमशाळेचा निकाल ३१.०३ टक्के इतकाच आहे.

इंग्रजी शाळांमध्ये केवळ उत्तीर्ण होणाऱ्या विद्याार्थ्यांनाच दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. मात्र आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांवर अशी सक्ती केली जात नसतानाही आश्रमशाळांनी ही कामगिरी केल्याने या शाळांचे कौतुक होत आहे.
original at -http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4703878.cms

करिअरच्या वेगळ्या वाटा



दहावीचा निकाल लागल्याने आता विद्याथीर् आणि पालकांपुढे असलेला प्रश्ान् म्हणजे कुठलं करिअर निवडायचं. ज्या विद्या
र्थ्यांना कमी मार्क मिळाले आहेत त्यांनी खचून जाऊ नये. कारण ग्लोबलायझेशनमुळे अनेक करिअर नव्याने उदयाला येत आहेत.

खरंतर या प्रश्ानवर विचार करायची ही योग्य वेळ नाही. झाड चांगलं वाढण्यासाठी लागवड केल्यापासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच शालेय जीवनातच मुलाच्या करिअरचा विचार करायला पाहिजे.

मूल पाचवीत गेल्यानंतर त्याला कुठल्या विषयात रस आहे हे पालकांनी जाणून घ्यावं. दहावी मुलाच्या शैक्षणिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होते. म्हणून त्याआधी आपला मार्ग निश्चित करणं आवश्यक आहे.

आपल्या देशात १२० विद्यापीठं आहेत. त्यात चार हजारहून जास्त सीनिअर आणि ज्युनिअर कॉलेजेस आहेत. कमी गुण मिळूनही पॉलिटेक्निकला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांदे (पू.) इथल्या खेरवाडीमधल्या र्गव्हन्मेण्ट पॉलिटेक्निक कॉलेज हा चांगला पर्याय आहे. बरेच पालक आपली इच्छा मुलांवर लादतात. प्रत्येक पालकाला आपलं मूल इंजिनिअर व्हावं असं वाटत असतं. पण ७० टक्क्यांपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ नये.

तंत्रज्ञान शाखेची आवड असणाऱ्यांसाठी कम्प्युटर हे क्षेत्र चांगलं आहे. या क्षेत्रात उत्तमोत्तम कोसेर्स आहेत. सध्याच्या काळात नोकरीच्या संधी दुमिर्ळ होत असल्यामुळे कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनी जॉब ओरिएण्टेड करिअर्सचा विचार करावा. मोबाइल रिपेअरिंगमध्येही चांगलं करिअर होऊ शकतं. याबरोबरीने टीव्ही, फ्रीज रिपेअरिंगचेही कोसेर्स चांगले आहेत. हे कोर्स केल्यावर तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता आणि चांगलं अर्थार्जन करू शकता. तसंच आयटीआयचे टेक्निकल कोसेर्सही करता येतील.

ग्रामीण भागातले किंवा शेतीची आवड असणारे विद्याथीर् शेतीमध्ये करिअर करू शकतात. त्यासाठी आज महाराष्ट्रात चांगली कॉलेजेस आहेत. पर्यावरणाची आवड असलेल्यांनी दहावीनंतर सायन्सला प्रवेश घ्यावा. त्यानंतर पाच वर्षं दापोली, राहुटी, परभणी आणि अकोला इथल्या कृषी विद्यापीठात शिक्षण घेता येईल. यात जमिनीची धूप कशी थांबवावी, तिचा कस वाढवणं यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्हाला पर्यावरणाचा एखादा विषय घेऊन रिसर्चही करता येतो.

ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्समध्ये रस आहे त्यांच्यासाठी 'टॅक्सेशन आणि ऑडिट' हे दोन कोर्स उत्तम आहेत. मुंबईच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये 'टॅक्सेशन आणि ऑडिट'चे चांगले कोसेर्स आहेत. हे कोर्स विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. प्रत्येक व्यवसायात ऑडिटची गरज भासते. त्यामुळे हा कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. याशिवाय हे विद्याथीर् स्वत:चा व्यवसायही करू शकतात. तसंच नोकरी करतानाच इन्कम टॅक्स भरणं, सोसायटी किंवा इतर आस्थापनांची अकाऊण्ट्स लिहिणं यासारखी खासगी कामंही करू शकतात. परंतु ही कामं करताना १२ वी नंतर तुम्हाला तीन वर्षांचा अनुभव किंवा बी.कॉम नंतर तीन वर्षांचा अनुभव असायला हवा. त्यामुळे टॅक्सेशनमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

ज्यांना आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स अशा शाखांमध्ये फारसा रस नाही त्यांच्यासाठी टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी अशी वेगळी करिअर्सही खुली आहेत. तुमच्याकडे टॅलेण्ट असेल आणि मेहनत घ्यायची तयारी असेल तर या क्षेत्रात स्काय इज लिमिट! तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता किंवा चांगल्या बुटिकमध्ये नोकरीही करू शकता. सध्या या क्षेत्रांचे खासगी संस्थांचे सहा ते आठ महिन्यांचे विविध कोसेर्स उपलब्ध आहेत. यात तुम्हाला कापडाचा पोत ओळखणं, स्टिचिंग करणं, विणणं, डिझायनिंग करणं यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात. जोडीला तुमची कल्पकता असल्यास या क्षेत्रात उत्तम यश मिळवता येईल.

जेमॉलॉजी हेही चांगलं करिअर म्हणून उदयाला येतंय. प्राचीन काळापासून माणसाला हिऱ्याचं, खड्याचं आकर्षण आहे. त्यामुळे जगभरात अनेक वर्षांर्पासून रत्नांचा व्यापार सुरू आहे. यामध्ये हिऱ्याला पैलू पाडण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि कौशल्याचा भाग असतो. दहावीनंतर या क्षेत्राची आवड असलेले विद्याथीर् हे कोसेर्स करू शकतात. त्याचा कालावधी साधारणत: सहा महिन्यांचा असतो.

ज्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये आवड नाही ते विद्याथीर् जेनेटिक्स किंवा सायकोलॉजी घेऊन एम.एस्सी. करू शकतात. एम.एस्सी. क्लायमेट किंवा पर्यावरण यासारखे वेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. तसंच तुम्हाला आवड असल्यास बोटीवर खलाशी म्हणूनही जाऊ शकता.

याखेरीज जाहिरात, कला, फोटोग्राफी, डिझायनिंग, कार डिझायनिंग, पत्रकारिता, कलाशाखा, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र किंवा अर्थशास्त्र यासारखे करिअरचे वेगळे पर्याय आहेतच. ऑल द बेस्ट!

- किरण जोग
(लेखक करिअर कौन्सेलर आहेत)

congrats " priti ramchandra sutar "

hi friends.....

congrats for all studetnts who success in SSC & HSC exams..... & wish all for best career & future

one good news...

ms. " priti ramchandra sutar " from kardinal pimenta adivasi highschool varkhanda
secure 93.53% in SSC.

this is gr8 news for all..... we can show our ability to world in this way now onwards & we will compete without any limit.

wish her all the best priti for your career & future

jai adivasi shakti!

marathi aani mumbai





































नवसू वळवी यांना डॉ. हेडगेवार पुरस्कार






राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने १९८९ मध्ये देशभरात सर्वत्र सेवा निधीचं संकलन करण्यात आले होते. या निधीद्वारे महाराष्ट्रात ६७५ सेवा प्रकल्प पुरस्कृत करण्यात आले आहेत. सेवा कार्यात आपलं आयुष्य वेचणाऱ्या व्यक्तींना या निधीतून डॉ. हेडगेवार सेवा पुरस्कार देण्यात येतो. या वषीर्चा पुरस्कार देवबांध येथील सह्यादी आदिवासी बहुविध सेवा संघाचे संस्थापक नवसू महादू वळवी यांना दिला जाणार आहे.

वनवासी सेवा आणि वनौषधी संवर्धन या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवारी सकाळी १० वाजता कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात पार पडेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याणमधील प्रसिद्ध आकिर्टेक्ट दिलीप दळवी असतील. चाइल्ड स्पेशालिस्ट डॉ. रामदास मराड यावेळी प्रमख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहसंघचालक अनिरुद्ध देशपांडे यांचे मोलाचे विचार ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने चालून आल्याची माहिती डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधीचे अध्यक्ष बापूराव मोकाशी यांनी दिली.


--

ओम भवती भिक्षांदेही !

ओम भवती भिक्षांदेही !

भारताचा चेहरा जगासमोर कसा आहे ? हे घरबसल्या जाणून घेण्याचे इंटरनेट हे एक सोपे माध्यम. वेगवेगळ्या वेबसाईटवर दिलेल्या माहितून भारत कसा आहे किंवा विभिन्न क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निरक्षणातून भारताचे वर्णन व्यक्तिगत ब्लॉगमध्ये कशाप्रकारे नोंदले आहे ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न भारताविषयी अनोखी माहिती समोर आणतो. आपलाच देश आपल्याला अनोळखी वाटू लागतो. मात्र, भिकारी- भिखारी आणि बेगर्स यांच्याविषयी इंटरनेटवर माहिती शोधत असताना "भारत हा भिकाऱ्यांचा देश आहे आणि तेथे भिकाऱ्यांपासून सावध राहण्यासाठी पुढील टिप्स लभात ठेवा' असे जेव्हा वाचनात आले, तेव्हा अस्वस्थ झालो. त्याच मनःस्थितीत नोंदलेल्या इतरही माहितीचा या "दखल' मध्ये उहापोह...

जळगावचे प्राध्यापक डॉ. सुनील मायी यांचे "आलो जन्मभरी मागाया' हे छोटेखानी पुस्तक साधारणतः सहा महिन्यांपूर्वी वाचनात आले. भिकाऱ्यांच्या विषयी त्यांनी केलेल्या निरीक्षणांची नोंद त्यात आहे. भिकाऱ्यांचे तीन- चार इरसाल कॅरेक्‍टर लेखकाने उभे केले असून, सार्वजनिक ठिकाणी आढळणाऱ्या सर्वच प्रकारच्या भिकाऱ्यांचे प्रातिनिधीक चित्रण त्यात आहे. वेगळ्याविषयावरील रंजक माहिती असल्यामुळे पुस्तक पटकन वाचून संपले. त्यानंतर या विषयाचा विसर पडला. "भुसावळमध्ये भिकाऱ्यांची संख्या वाढली' अशी बातमी तीन- एक महिन्यापूर्वी वाचनात आली. या भिकाऱ्यांमध्ये "गर्दूल्ले' जास्त आहेत, असाही संदर्भ होता. पुन्हा विषय स्मृतीबाहेर गेला.
इंटरेटवर विविध विषयांची माहिती शोधण्याची मला सवय आहे. एकेदिवशी सहज भिकारी- भिखारी आणि बेगर्स हे शब्द गुगलवर ऑपरेट करुन माहितीचा शोध घेतला. समोर आलेल्या वास्तवाने उडालोच. प्रवासी आणि पर्यटनाशी संबंधित अनेक वेबसाइटची यादी समोर आली. भिकारी आणि पर्यंटनाचा काय संबंध ? उत्सुकता वाढली. "भारतात पर्यटनाला जाता आहात ?' असा प्रश्‍न करीत पर्यटकांनी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी या विषयी या वेबसाईटवर अनेक टिप्स दिलेल्या होत्या. त्यात भारतातील भिकाऱ्यांपासून सावध ! असा इशारा नोंदलेला होता. इंडिया ट्रॅव्हल टिप्स, वर्ल्ड ऑफ इंडिया आणि इंडिया डॉट ट्रॅव्हल डॉट एजन्ट डॉट कॉमवर या टिप्स वाचता आल्या.या तीनही वेबसाईटवर भिकाऱ्यांपासून सावध राहण्याच्या 5 ते 7 टिप्स होत्या. भारतात अपंग वृद्ध- महिला- मुले भिक मागतात मात्र काही देखावा करतात,उपाशी मुले दाखवून भिक मागणाऱ्या महीला असतात, वाहनातून उतरल्यावर लगोच काही देवू नका तर परत जाताना द्या, मुलांना भिक देतांना बावनासील होवू नको कारण त्यांचे पालकच त्यांना तसे करण्यास सांगतात, मुलांना रोख स्वरुपात भिक देवू नका कारण पालक ती हिसकावून घेतात, काही करावेसे वाटलेच तर स्वयंसेवी संस्थांना मदत करा अशा अनेक टिप्स वाचनात आल्या. भारताच्या पर्यंटन विषयक आणि समाजिक चेहऱ्याचे विद्रुपिकरण या वेबसाईटच्या माध्यममातून कसे होत आहे ? असा प्रश्‍न मनांत निर्माण झाला. त्यावेळी प्रा. श्री. मायी यांच्या पुस्तकातील अनेक निरीक्षणे आठवली. मंदिर, रेल्वेस्थानक, बसस्थानक, बाग- बगिचे अशा सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या भिकाऱ्यांची गर्दी आठवली. या ठिकाणांशी भारतीय पर्यटनस्थळे थेट संबंधित आहेत, त्यामुळे तेथे दिसणारा भारत वेबसाईटच्या माध्यमातून व्यक्त होतो हे लक्षात आले. कामत डॉट कॉम या ब्लॉगवरही भिकाऱ्यांच्या विषयी अशीच मात्र, भारतीय संस्क
ृतीचे चुकीचे दर्शन घडविणारी माहिती आढळून आली. लेखकाने अत्यंत अर्धवट माहितीवर निरीक्षण नोंदविले आहे. तो म्हणतो, "भारतात भिकारी परंपरेने तयार होतात. हिंदू साधू होण्यासाठी प्रथम भिक मागता आली पाहिजे'. ही माहिती सुद्दा चेहरा बिघडवणारीच वाटते.
भारतातील तपस्वी, विद्वान साधू- महंतांच्या प्रतिमांना छेद देणारे हे लेखन अस्वस्थ करते. भारतीय संस्कृतीत "भिक्षा मागणे' हा सुद्धा एक संस्कार आहे, याची माहिती कोणीतरी असा अर्धवट लेखकांना द्यायला हवी. अध्ययन करणारा ब्रह्मचारी आणि सर्व सुखांकडे पाठ फिरवणारा संन्याशी यांना पोटापुरती भिक्षा मागण्या हक्क संस्कृतीने मान्य केला आहे. गुरूदक्षिणा देण्यासाठी विद्यार्थी, विवाह- यज्ञ किंवा आई- वडील यांच्या पोषणासाठीही भिक्षा मागणे योग्य मानले गेले आहे. आपले दैन्य घालविण्यासाठी राजा किंवा धनिकाकडे याचना करण्यासही संस्कृतीची मान्यता आहे. उपनयन संस्कार (मौंज) करताना आचार्यांनी बटूला ब्रह्मश्‍चर्याविषयी उपदेश केल्यानंतर मातेकडे बटूने भीक्षा मागण्याचाही संस्कार केला जातो. पहिल्या भिक्षेवरही आचार्यांचाच अधिकार असतो. भारतीय संस्कृती दर्शनातील या बाबीही ठळकपणे समोर मांडल्या गेल्या पाहिजेत. याचा अर्थ या प्रथा- परंपरांचे समर्थन करण्याचा हा किंवा त्या योग्यच असल्याचा दावा करण्याचा येथे प्रयत्न नाही हेही येथे स्पष्ट व्हावे. खरेतर भारतीय संस्कृती कोषात "भिक्षा' शब्दाची व्याख्या अत्यंत समर्पक शब्दांत दिली आहे. तेथे तर्कतीर्थ म्हणतात, शरीर धडधाकट असूनही लोकांकडे अन्न, वस्र, पात्र, द्रव्य याची याचना करणे म्हणजे भिक्षा मागणे.
इंटरनेटवर "भिकारी' विषयावरील शोध मोहिमेत आणखी काही वेगळे संदर्भ आढळले. भारताची राजधानी असलेल्या नवीदिल्लीत सन 2007 मध्ये भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तेथे लाखभर भिकारी आढळले. त्यापैकी 4 पोस्ट ग्रॅज्युएट, 6 पदवीधर, 796 बारावी उत्तीर्ण होते. एकूणपैकी 799 पुरूष व 1541 महिला शरीरिकदृष्ट्या पूर्णतः धडधाकट होत्या. यातील काही भिकाऱ्यांचे रोजचे उत्पन्न (कमाई ?)500 रुपये होती.
ंमधील भिकाऱ्यांच्या संदर्भात अशीच एक आकडेवारी लक्षवेधून गेली.सन 2004 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात नवीदिल्लीत 60 हजार, मुंबईत 3 लाख, कोलकत्यात 75 हजार, बंगळूरमद्ये 56 हजार भिकारी आढळले. हैदराबाद महानगराच्या बाबतीत असा निष्कर्ष आहे की तेथे दर 375 माणसांच्या पाठीमागे एक भिकारी आहे...आता बोला. हीच गंमत मुंबईच्या संदर्भात आहे. 1996 मध्ये तेथे 20 हजार भिकारी होते, आज तेथे 6 लाख भिकारी आहेत. मुंबईत भिकाऱ्यांच्या माध्यमातून वार्षिक किती रुपयांची उलाढाल होते ? याची आकडेवारीही राज्यशासनाने जाहीर केली आहे आणि तो आकडा आहे...180 कोटी मात्र. सांगली पोलिस दरवर्षी भिकाऱ्यांसाठी दिवाळी साजरी करतात.
काही श्रीमंत भिकाऱ्यांच्याही नोंदी आढळल्या. अहमदाबाद येथे एका भिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या झोपण्याच्या कापडात 44 हजार रुपये कॅश मिळाली होती. तेथेच भद्रकाली मंदिराजवळची एक भिकारी महिला नातवास खर्च करण्यासाठी रोज 50 रुपये देत होती. सांरगपूरच्या एक भिकाऱ्यांने समाजिक कार्यात सव्वालाखांची देणगी दिली होती.
हे सारे संदर्भ वाचताना गंमत वाटत होती. भिकारी हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग आहे हे मान्य केले तरी, विदेशी पर्यटकांना त्यांच्या रुपात भारताची ओळख होत आहे या विषयी खेदही वाटत होता. पुन्हा प्रा. श्री. मायी पुस्तकातील एक सूचना मार्गदर्शक वाटली. ती म्हणजे, महानगरांमध्ये भिकाऱ्यांसाठी "बेगर्स होम' उभारले गेले पाहीजेत. जळगावमध्येही या सूचनेवर महापालिका व स्वयंसेवी वेगळा विचार करायला काय हरकत आहे ?

सदराशी संबंध नसलेली गोष्ट

एका आयटी कंपनीच्या समोर भिक मागणाऱ्या भिकाऱ्यास त्या कंपनीतील बडा अधिकारी 50 रुपयांची नोट देत असे. भिकारी त्याला हसून नमस्कार करायचा. काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्यांने 50 ऐवजी 20 ची नोट देणे सुरू केले. भिकारी ती नोट घ्यायचा आणि केवळ स्मित करायचा. पुन्हा काही महिन्यांनी त्या अधिकाऱ्यांने त्या भिकाऱ्यास 10 रुपयांची नोट देणे सुरू केले. त्यावर निर्विकारपणे भिकारी त्या अधिकाऱ्यांस म्हणाला, "महाशय आपण काही अडचणीत आङात का ? आपण मला कमी रकमेची नोट देत आहात ?' तो अधिकारी म्हणाला होय, "पूर्वी माजे खर्च कमी होते. आता, माझा मोठा मुलगा उच्च शिक्षणाला गेला म्हणून मी 50 ऐवजी 20 रुपये देत होतो. त्यानंतर मुलगी कॉंलेजात गेली. तीचा खर्च वाढला म्हणून मी तुला 10 रुपये देत आहे' तो भिकारी निर्विकारपणे म्हणाला, "तुम्हाला अजून तिसरे मूल आहे का ?' अधिकारी म्हणाला, "होय. एक लहान मुलगा आहे.' त्यावर भिकारी परखडपणे म्हणाला, "महाशय, या तिसऱ्या मुलाचे शिक्षण मला देण्याच्या रकमेतून कृपया करु नका'.

original at -http://marathiblogs.net/node/44893


'ती'ची गोष्ट...




मुलगाच मुलीच्या घरी लग्नानंतर मुलगाच मुलीच्या घरी राहायला आला तर? म्हणजे घरजावई म्हणून नव्हे, तर समाजातली- सर्व घरांमधली रीत म्हणून. मुलीचं घर, तिची माणसं, तिचं आयुष्य आहे तसंच पुढे चालू राहणार. किती छान कल्पना वाटते ना?

गंमत म्हणजे ही काही नुसतीच कल्पना नाही तर प्रत्यक्ष तसं घडतंही आहे.

नुकतीच मी 'मेघालय'मध्ये जाऊन आले. नुसते पर्यटक म्हणून तुम्ही गेलात तर कदाचित सगळं अनुभवायला नाही मिळणार. पण मला 'जोवाई' या गावामध्ये तिथल्या कुटुंबात राहता आलं. आई- तिची मुलगी आणि मुलीची मुलगी असं एकत्र नांदतं घर मी अनुभवलं.

नवराच लग्नाननंतर मुलीकडे राहायला येतो. तीन-चार बहिणी असतील तर आईच्या घराशेजारी घर बांधून त्या राहतात आणि सर्वांत धाकटी मुलगी तिच्या नवऱ्यासह आई-वडिलांकडेच राहते.

याला मातृसत्ताक पद्धती असं सरसकट म्हणू नका, ही आहे 'मातृवारस' पद्धत. म्हणजे मातृ'सत्ता' नाही पण वारसा मात्र आईकडून मुलीकडे जातो. कुटुंबप्रमुख नवराच असतो पण उत्सव, सण, धार्मिक विधी यामध्ये महत्त्व असतं घरच्या स्त्रीला आणि तिच्या मामाला किंवा भावाला. कसलं छान वाटत होतं त्या कुटुंबात राहताना.

मोठे सण - समारंभ वगळता सासू-सुनेचा संबंधच नाही. सून राहणार आपल्या आईजवळ आणि सासू राहणार तिच्या मुलीजवळ. म्हणजे भांड्याला भांडं लागायचा प्रश्‍नच नाही. भांडण नाही, इगो क्‍लॅश नाही. नवऱ्याची दोन्हीकडून होणारी रस्सीखेच नाही.

या सगळ्यावर कडी करणारी आणखी एक गोष्ट. ती म्हणजे नवरा राहतो बायकोकडे आणि जेवायला मात्र जातो आपल्या आईकडे. म्हणजे नवऱ्यासाठी स्वयंपाक करायचीही भानगड नाही. 'बाई आणि तिची मुलं' हेच नातं केंद्रस्थानी.

आदिवासी कुटुंबामधून आलेली ही परंपरा. पण आज ही कुटुंबं चांगली सुस्थितीमध्ये आहेत.शिकलेली आहेत. आम्ही राहात होतो त्या कुटुंबामधली मुख्य स्त्री कॉलेजमध्ये राज्यशास्त्राची प्राध्यापक होती. अस्खलित इंग्रजी बोलत होती.

बदलत्या काळानुसार मातृवारस पद्धतीत काही ठिकाणी बदल होत आहेत. पण मेघालयात प्रामुख्याने ही पद्धत टिकून आहे.

मैत्रिणींनो, मग वाटतंय ना की महाराष्ट्रात फुकट इतकी वर्षं काढली म्हणून? की इथे आणायचा ठरवताय मेघालयातला मुलगा लग्न करून?

original at - http://beta.esakal.com/Blog/BlogDetail.aspx?Id=a24dafcc-b2f8-40f1-98ce-30efba4a908d&SID=742


आणि मी डॉक्टर झाले



आपल्या आयुष्यात करिअर आणि शिक्षण यांचा संबंध असतो. अनेक जण शिक्षण घेतात, शाळा, कॉलेजच्या प्रगतीपुस्तकात ते चमक
तात. करिअर करताना मात्र वेगळ्याच वाटेने जातात. तिथेही स्वत:च स्थान निर्माण करतात. त्यांच्या आयुष्यात शिक्षणाला किती महत्त्व आहे, हे सांगणारा कॉलम 'मेरिट लिस्ट'.

.......

निशिगंधा वाड अभिनेत्री म्हणून सर्वांना माहिती आहे. बारावीत मेरिट लिस्टमधे आलेल्या निशिगंधाने पीएचडी पूर्ण केली आहे. शिक्षण हे आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, याविषयी सांगतेय स्वत: निशिगंधा वाड.

....

कामाचे व्याप, एकामागोमाग आलेल्या जबाबदाऱ्या, त्यातून मिळणारे असंख्य अनुभव... हे सगळं अनुभवत असताना आयुष्याला नकळत वेगाची सवय होऊन गेली. आपल्याच पाऊलखुणा कधी मागे पडल्या ते कळलंही नाही.

मी डॉक्टर निशिगंधा वाड, अशी ओळख करून देताना आज खरंच खूप बरं वाटतं. कारण आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आव्हानं स्वीकारण्यातला आणि ती पूर्ण करण्यातला आनंद काय असतो ते पदवीने मला शिकवलं. खरं म्हणजे मी आयुष्यात बऱ्यापैकी स्थिरावले होते. संसार, करिअर या महत्त्वाच्या टप्प्यांनी लय पकडली होती. पण तरीही मला डॉक्टरेट मिळवायचीच होती.

आमच्या घरावर सरस्वतीचा पहिल्यापासूनच वरदहस्त. माझी आई शिक्षिका, थोरली बहीण प्राजक्ता अतिशय आदर्श विद्याथीर्नी. प्रचंड बुद्धिमान, गुणी... पण मी घरातलं आगाऊ शेंडेफळ म्हणून ओळखले जायचे. शाळेत असताना जरी वर्गात वरचा नंबर येत असला तरी नाटक आणि अभ्यास असा डोलारा मी सावरत असायचे. आमचे सगळेच नातेवाईक उच्चशिक्षित. माझा कलाक्षेत्राकडचा ओघ पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटायचं. पण प्रत्येकवेळी माझी आई खंबीरपणे माझ्यामागे उभी राहिली.

घरच्यांनी मला पाठिंबा तर दिलाच पण माझ्या अभ्यासात कुठेही खंड पडणार नाही ना याची काळजीही घेतली. त्यांच्या या पाठबळामुळे दहावीत पहिल्या पन्नासात माझं नाव झळकलं. रिझल्टच्या दिवशी मी दिनानाथ नाट्यगृहात 'मोरूची मावशी'चा प्रयोग करत होते. रिझल्टची बातमी आली तेव्हा सगळ्या कलाकारांनी मला पेन, कम्पासपेटी, गोष्टीचं पुस्तक अशा भेटी देऊन आनंद साजरा केला होता. त्या छोट्या सोहळ्याचा आनंद आजही तसाच्या तसा डोळ्यांसमोर उभा आहे.

८७ मधे मी बारावी झाले. मी रूपारेल कॉलेजमधे आर्ट्सला शिकत होते. अभिनयक्षेत्रातला माझा ओढा पाहून प्रिन्सिपल प्रधान मला शक्य तितकी मदत करायचे. मी तिसरा भाषा विषय म्हणून हौसेने जर्मन घेतलं होतं. पण ट्युशन्ससाठी वेळ नव्हता. मुलुंड ते दादर दरम्यान लोकल प्रवासात जर्मन विषयाची डिक्शनरी पाठ करायची सवय लावून घेतली. त्या बळावर पेपर्स लिहिले. बारावीत मी मेरीटमधे तिसरी आले तेव्हा माझ्यापेक्षा शिक्षक आणि घरातल्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. त्यांच्या आनंदानेच मला शिक्षणातल्या पुढच्या टप्प्याचे वेध लावले आणि बाहेरच्या जगाचा अनुभव घेत असताना शिक्षणाबद्दलची ओढही उत्तरोत्तर वाढत गेली.

ग्रॅज्युएशननंतर रुईयातून थिसीस लिहित होते. याचवेळी माझ्या मुलीचा जन्म झाला. आयुष्यातल्या या नव्या पर्वामुळे माझ्या शिक्षणात खंड येणार या गोष्टीने मी अस्वस्थ झाले. त्यावेळी माझ्या गाईड, घरचे खंबीरपणे माझ्यामागे उभे राहिले. मीही पुन्हा निश्चय केला आणि या मेहनतीचं फळ मिळालं. वाड घराण्याची शेंडेफळ निशिगंधा, डॉक्टर निशिगंधा वाड झाले.

कलाक्षेत्रात करिअर करूनही डॉक्टरेट मिळवायची ओढ किंवा आज जे काही कमावलंय त्याचं संपूर्ण श्रेय माझ्या आईबाबांना जातं. परमेश्वरांनी आपल्याला जे दिलंय त्यात स्वत:च्या मेहनतीने आपण अठरा टक्क्यांनी वाढ करू शकतो. पण आईवडिल यांचे संस्कार आयुष्याला शंभर टक्के आकार देतात, हे मी अनुभवातून सांगतेय.

माझ्या आईचं एक वाक्य आहे, संस्कृतीची पाळंमुळं घट्ट रुजली असली की कुठल्याही आकाशात आपल्या पंखांचं बळ आजमवायचं भय नको.... बालपणापासून ते आजच्या या क्षणापर्यंत हे पाठबळ माझ्यासोबत आहे.

चाकोरीबाहेरची शाळा



भाईंदरजवळ उत्तनच्या निसर्गरम्य परिसरात 'केशवसृष्टी' वसली आहे. केशवसृष्टीच्या विविध उपक्रमांपैकी रामरत्ना विद्य
ा मंदिर एक आहे. अभ्यासाबरोबर मुलाचा मानसिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी आवश्यक असणारे उपक्रम शाळेत आहेत.

बरेच पालक आपापल्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे सर्वांच्याच घरात आजी-आजोबा असतीलच असं नाही. ती जबाबदारी आजच्या रेसिडेन्शियल स्कूल्सनी उचलली आहे. रेसिडेन्शियल स्कूलची संकल्पना नवीन नाही. फक्त आजच्या काळात त्याची गरज जास्त आहे. बोडिर्ंग स्कूलसारखीच ही रेसिडेन्शियल स्कूल्स असतात. बोडिर्ंग स्कूल्स हिल स्टेशनवर, घरापासून लांब असायची. परंतु रेसिडेन्शिअल स्कूल मंुबईतल्या ताणतणावांनी भरलेल्या वातावरणापासून दूर, निसर्गरम्य ठिकाणी असली तरी शहरापासून खूप लांब नाहीत.

रामरत्ना विद्या मंदिरविषयी मुख्याध्यापिका अनिता साहू यांनी अधिक माहिती दिली, 'मुलं मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. आपण संस्कार देऊ तशी ती घडतात. ही जबाबदारी पालकांबरोबर शाळेची आणि शाळेल्या शिक्षकांची असते. रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मुलं शाळेतच राहत असल्यामुळे जबाबदारी जास्त असते. शिक्षकांनाच दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात. आपल्या देशाची ही भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावी याचा विचार करूनच अभ्यासाबरोबर इथली दिनचर्या आखली जाते. अभ्यासाबरोबर आम्ही मुलाच्या मनात देशप्रेमही जागृत करतो. शाळेला यंदा बारा वर्षं पूर्ण झाली. आमच्या पहिल्या बॅचचा विद्याथीर् परदेशात उच्चशिक्षण घेऊन भारतात परतला आहे.'

शाळेचा परिसर तीस एकरमध्ये पसरला असून त्यात शाळा, हॉस्टेल, स्वीमिंग पूल, मेस, सात बेडचं हॉस्पिटल आणि मैदान आहे. शाळा चौथी ते बारावीपर्यंत आहे. शाळेत सीबीएससी अभ्यासक्रम आहेत. शाळेने गुरूशिष्य परंपरा जपली आहे. मुलांवर वैयक्तिक लक्ष ठेवता यावं यासाठी दहा मुलांमागे एक शिक्षक नेमला आहे.

सकाळी साडेपाच वाजता मुलांचा दिवस सुरू होतो. सकाळच्या प्रार्थनेत मुलांना स्तोत्रं शिकवली जातात. त्यानंतर योगासनं होतात. व्यायामानंतर आंघोळ करून, ब्रेकफास्ट घेऊन मुलं शाळेसाठी तयार होतात.

रोज संध्याकाळी खेळासाठी अर्धा तास राखून ठेवला जातो. या तासामध्ये मुलांना स्वीमिंग, कराटे, बास्केट बॉल असे बारा खेळ शिकवले जातात. शाळा संपल्यावरही मैदानी खेळासाठी एक तास राखीव ठेवला जातो. रात्रीच्या जेवणानंतर मुलांसाठी संस्कार वर्ग असतो. त्यानंतर अभ्यास, वर्तमानपत्र वाचन आणि टीव्ही पाहण्यासाठी एक तास असतो. स्वत:चे बूट पॉलिश करणं, दुसऱ्या दिवशीची तयारी तसंच आपलं कपाट व्यवस्थित आणि नीटनेटकं ठेवणं यातून मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात. रात्री दहाला मुलांचा दिवस संपतो. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलं घरी जातात. शाळेला गुरुवारी सुट्टी असते. महिन्यातून एका रविवारी पालकांची मीटिंग असते.

शिक्षकांनाही खास प्रशिक्षण दिलं जातं. शाळेचे चेअरमन महेंदा काबरा आणि व्हाइस चेअरमन अरविंद रेगे हे प्रशिक्षण देतात. अभ्यासामध्ये कमी गती असलेल्या विद्यार्थ्यांची वर्षभरामध्ये प्रगती होऊन ते साठ आणि सत्तर टक्क्यांपर्यंत ते मार्क मिळवतात. गेली पाच वर्षं शाळेला 'बेस्ट स्कूल'चं पारितोषिक मिळालं आहे.

- प्रतिनिधी

परिपूर्ण शाळा



:
- कविता कर्वे
प्रिन्सिपॉल, आयएफएफएस
बिलबाँग हाय स्कूल,
ठाणेच्या माजी प्रिन्सिपॉल


पूर्वी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकायला जाणारी मुलं ठराविक वर्गातली असायची. आज रेसिडेन्शियल आणि डे-स्कूल्सची मागणी वाढत आहे. शाळेत मुलाच्या अभ्यासाबरोबरीने त्याची आवड लक्षात घेऊन त्यानुसार त्याला एखादी कला किंवा खेळ शिकवले जातात. रेसिडेन्शिल स्कूलची संकल्पना बोर्डिंग स्कूलवर आधारित असली तरी दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. रेसिडेन्शियल स्कूल शहराच्या धकाधकीपासून दूर असली तरी शहरापासून लांब नसतात. कर्जतमध्ये 'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' हे असंच एक रेसिडेन्शियल स्कूल सुरू होत आहे.
.......

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, Values are not taught but caught. जीवनमूल्यं ही शिकवता येत नाही, ती आत्मसात करावी लागतात. ही म्हण खरी असली तरी पूर्णसत्य नाही. जीवनमूल्यं शिकवता येत नाही ही गोष्ट खरी आहे पण जीवनमूल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र शिकवावा लागतो. मूल जन्माला येतं त्यावेळी त्याला भल्याबुऱ्याची जाण नसते. चांगल्या-वाईट गोष्टी शिकवण्याचं काम हे आई-वडिल आणि गुरुजनांचं असतं.

कर्जतमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या 'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' या रेसिडेन्शियल स्कूलचा मुख्य उद्देशच मुलांना व्यापक दृष्टिकोन देण्याचा आहे. यामुळे त्यांच्या शाळेचं घोषवाक्यच 'वसुधैव कुटंुबकम्' असं आहे. याचाच अर्थ संपूर्ण विश्व आपल्या कुटुंबाप्रमाणे असून त्याच्या हिताचाच विचार आपल्याकडून व्हायला हवा. शाळेबद्दलची अधिकाधिक माहिती पालकांना मिळावी यासाठी ठिकठिकाणी सेमिनार्सचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची माहिती खाली दिली आहे.

'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' या शाळेच्या उभारणीमध्ये भानुशाली कुटंुबाचं फार मोठं योगदान आहे. शाळेचे मॅनेजिंग ट्रस्टी पी. सुब्रमण्यम यांचाही शाळेच्या उभारणीमध्ये मोठा सहभाग आहे.

शाळेची उद्दिष्ट्य :
आजचे पालक करिअर ओरिएण्टेड असल्यामुळे त्यांच्याकडे आपल्या मुलाला देण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांचा प्रश्ान् सतत त्यांना भेडसावत असतो. करिअर करताना त्यांचं अर्धं लक्ष शाळा आणि पाळणाघरात असणाऱ्या मुलाकडे असते. मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार वाढत असल्याने मुलांविषयी त्यांना सतत काळजी वाटत असते. म्हणूनच आजच्या पालकांसाठी रेसिडेन्शियल स्कूल्स फायदेशीर ठरत आहेत.

या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रमाचा शिकवला जातो. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असते. या शाळेमध्ये अभ्यासाबरोबर मुलांच्या सर्वांगिण विकासावरही भर दिला जातो. मुलाच्या आवडीची कला, खेळ यामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं जातं. यामध्ये मुलाची आवड लक्षात घेतली जाते. इथे मूल स्वावलंबी होतं. तसंच त्याच्यामधले नेतृत्त्वगुण वाढीला लागतात.

शाळेची वैशिष्ट्य:
इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन ही शाळा 'को-एडेड' आहे. या शाळेत आयसीएसई अभ्यासक्रम प्रस्तावित आहे. मुलांच्या मनात परीक्षेची भीती निर्माण होऊ नये म्हणून प्राथमिक वर्गांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. त्याऐवजी मुलांची नियमित चाचणी केली जाईल. त्याविषयीचं दडपण मुलांना येऊ नये याचीही काळजी घेतली जाईल. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

शाळेमध्ये मुलांना शिकवली जाणारी जीवनमूल्यं,

० जगा आणि जगू द्या.
० आपल्याबरोबरच्या विद्यार्थ्यांशी सलोख्याने वागा.
० एकजुटीने राहा.
० प्रेम, सत्य आणि सहिष्णुतेचं महत्त्व जाणा.

शाळेचं वेगळेपण :
रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मुलं शिस्तबद्ध, स्वावलंबी होतात. पण बरेचदा हे गुण त्यांना कुटुंबापासून दूर नेतात. इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन मात्र मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये दुवा बनण्याचं काम करेल. मुलामध्ये घरची ओढ टिकून राहण्यासाठी महिन्यातून एकदा मुलाला पालकांसोबत शेवटच्या शुक्रवारी संध्याकाळी घरी जाता येईल. आज विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांना आजी-आजोबांची माया मिळत नाही. इंडिया र्फस्ट फाऊण्डेशनने आपल्या आठवड्याच्या कार्यक्रमांमध्ये खास आजी-आजोबांसाठी तास राखून ठेवला आहे.

वर्गातल्या एका मुलाच्या आजीआजोबांना आठ ते दहा दिवस शाळेत राहता येईल. त्या दिवशी आजीआजोबा आपल्या नातवंडासोबत तसंच त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत एक दिवस घालवतील. त्यांना गोष्टी सांगतील. गाणी, स्तोत्रं शिकवतील. आजी-आजोबांना इथे फक्त येण्याचा खर्च करावा लागेल. त्यांच्या राहण्याचा, जेवण्याखाण्याचा खर्च करावा लागणार नाही.

मुलांना देशातल्या तसंच परदेशातल्या कला शिकवण्यासाठी 'ग्लोबल व्हिलेज' उभारण्यात आलं आहे. मेडिटेशन, योग शिकण्यासाठी खास सेण्टर उभारलं आहे. विश्वातल्या प्रत्येक देशातल्या मान्यवरांविषयी माहिती देण्यासाठी 'हॉल ऑफ फेम'ची योजना करण्यात आली आहे. याशिवाय मुलांसाठी अद्ययावत सोयींनी सुसज्ज असं हॉस्टेलही बांधण्यात आलं आहे.

प्रत्येक मूल हे खास असतं. त्याची स्वत:ची ओळख असते. मुलामधली निरागसता न घालवता त्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून घडवण्याचा वसा इंडिया र्फस्ट फाऊण्डेशनने घेतला आहे. मुलामध्ये 'ए' अॅम्बिशनचा, 'बी' ब्रेव्हरीचा आणि 'सी' कॉन्फिडन्सचा रुजवण्यात शाळेला यश येईल हे मात्र निश्चित.

- कुमुद इतराज

प्रगती फास्ट करिअर फीस्ट


बारावीचा रिझल्ट लागून आता अॅडमिशनची धांदल उडालीय. मिळालेल्या मार्क्सवर फॅकल्टी निवडण्याची धावाधाव सुरू आहे. पण, मार्केटमध्ये कोणत्या करिअर्सची चलती आहे, हे कुणीतरी सांगायला हवं. आपल्या आवडत्या फिल्डमध्ये किती संधी आहेत हेही मुलांना ठाऊक नसतं. इतकंच नव्हे, तर करिअर निवडताना कोणते निकष ठरवावेत हेही समजून घेतलं जात नाही. हे टळावं म्हणून 'मुंबई टाइम्स प्रगती फास्ट'ने करिअर सेमिनारचं आयोजन केलंय. ११ जूनला दुपारी दोन ते पाच या तीन तासांमध्ये एक्स्पर्ट्स खूप नवी दालनं खुली करणार आहेत.

चर्चगेटच्या गव्हन्मेंण्ट लॉ कॉलेजमध्ये एक्पर्ट्सचं मार्गदर्शन आणि त्यांच्याशी चर्चा असा का कार्यक्रम असेल. गव्हन्मेंट लॉ कॉलेज अॅल्युम्नाय असोसिएशनचं सहकार्य या कार्यक्रमाला मिळालंय. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य असेल.

करिअरच्या मैदानातही मराठीच पुढे

आपण मध्यमवर्गीय मराठी मुलं आणि पालक करिअर निवडताना नेमके कुठे अडखळतो. आपल्या सामाजिक आथिर्क स्थितीमुळे आपल्या डोक्यात कुठले मेण्टल ब्लॉक असतात, हे एकदा समजून घेतलं की मग मराठी मुलांच्या टॅलेण्टला कुणीच रोखू शकत नाही. हे लक्षात घेऊन 'करिअरच्या मैदानातही मराठीच पुढे' या विषयावर प्रसिद्ध कौन्सेलर वृषाली आठल्ये अनुभव मांडतील.

घाई-गडबडीतही कसं निवडाल करिअर

बारावीचा रिझल्ट लागलाय. दहावीचा रिझल्ट लवकरच लागेल. त्यामुळे करिअर निवडण्यात फारसा वेळ नाही. पण अशावेळेस म्हणजे घाईगडबडीतही करिअर कसं निवडता येईल, या विषयावर ग्रोथ सेण्टरच्या सुचित्रा सुवेर् बोलतील. घाईतही माहिती कशी मिळवावी आणि निर्णय करताना कोणती काळजी घ्यावी, असा हा विषय आहे. शिवाय हे टाळण्यासाठी करिअर प्लॅनिंगविषयीही त्या बोलणार आहेत.

एज्युकेशन लोन्स कसे मिळवाल?

सध्या शिक्षण महाग झालंय. पण एज्युकेशन लोन्स हा यावर पर्याय आहे. हा खूप महत्त्वाचा आणि दुर्लक्षित विषयावर या विषयातले तज्ज्ञ माहिती देतील. कोणत्या कोर्सला, कोणती बँक कशी कर्ज देते किंवा लोनसाठी अॅपिअर कसं होता येईल याची सगळी माहिती यावेळी दिली जाईल.

बोला बिनधास्त

हे मार्गदर्शन पार पडल्यावर तुम्हाला या तज्ज्ञांशी बोलून तुमच्या शंकांचं समाधान करून घेता येईल. या थेट इण्टरअॅक्टिव सेशनमध्ये तुम्ही आधी लिहून प्रश्न विचारू शकता. त्यातील निवडक आणि अधिकाधिक प्रश्नावर एक्स्पर्ट्स उत्तरं देतील.

घोकंपट्टी ते आयटीबीटी फास्ट फॉर्वर्ड



'बे एके बे' म्हणत घोकंपट्टी करत परंपरागत व्यवस्थेला धक्का न देता त्याच त्या चाकोरीभोवती फिरणाऱ्या शिक्षण पद्धत
ीच्या चक्रव्युहातून बाहेर पडणारी पिढी पूवीर् भांबावलेली असायची. वास्तवतेची जाण आल्यावर आपण नक्की इतकी वषेर् काय शिकलो, याचे पुनरावलोकन करत बसायची. तेव्हा त्यांच्या ध्यानात यायचं की, हे सर्व पुस्तकी होतं. खरं जग निराळंच आहे. मग वास्तव जगाची ओळख सुरू व्हायची. तोपर्यंत बराचसा काळ निघून जायचा...ही परिस्थिती आता बदललीय. फास्ट फूडच्या या जगात शिक्षणही तसंच झालंय. स्पधेर्च्या वर्तुळात राहाताना बदलाच्या वाऱ्यांना समाजावून घेऊन तावूनसुलाखून यशाच्या शिखरावर पोहोचणारी नवी पिढी उदयास आली आहे. त्याला कारण शिक्षणाचे बदललेले स्वरूप!

जागतिक स्पधेर्च्या या युगात येणाऱ्या समस्यांना तोंड देणारं, कल्पनांना मूर्त स्वरूप देणारं शिक्षण आता अपेक्षित आहे. त्या अपेक्षांची पूतीर् करणारे अनेकविध अभ्यासक्रम निर्माण होऊ लागले आहेत. परंपरागत शिक्षण पद्धतीला छेद देऊन नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भक्कम मनोधैर्य आणि व्यापक कल्पनादृष्टी असलेले विद्याथीर् सध्याच्या शिक्षणपद्धतीतून घडताना दिसतात. पूवीर् दहावी, बारावी, पदवी आणि त्यानंतर ठराविक अभ्यासक्रम असायचे. ते पूर्ण करून स्वप्न पूर्ण केलं जायचं. आता येणारी प्रत्येक पहाट काहीतरी नवीन घेऊन येत असल्यानं त्या नव्याशी जुळवून घेणारे अभ्यासक्रम येऊ लागलेत.

महाराष्ट्राचा विचार केला, तर ज्ञानाची ही गंगोत्री विद्यार्थ्यांपर्यंत पाहोचवण्यासाठी अनेक विद्यापीठे आहेत. राज्याच्या प्रत्येक भागात विविध विद्यापीठे सुरू करून प्रत्येकाला ज्ञानाचा मार्ग दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ यांचा उल्लेख करावा लागतो. या विद्यापीठांशिवाय कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी देणारी तसेच अन्नधान्याची, फळेफुलांची कमतरता राहू न देण्यासाठी संशोधनाचे काम करणारी कोकण कृषी विद्यीपीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठेही आहेत. बदलणाऱ्या समाजव्यवस्थेचा सर्वांगीण अभ्यास करणारी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशियल सायन्स, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अॅण्ड इकॉनॉमिक्स, डेक्कन कॉलेज ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थांद्वारे वेगळ्या क्षेत्रात तरुणांना काम करता येते. कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय ही भाषांच्या बदलत्या प्रवाहांची ओळख करून देणारी विद्यापीठेही आहेत. आयआयटीद्वारे संशोधनाच्या विश्वात विद्यार्थ्यांना काम करता येते. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठही आहे.

या विद्यापीठांबरोबरच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. डॉक्टर, इंजिनीअर, वकील, शिक्षक यासाठी असणाऱ्या प्रचलित कोसेर्ससह सध्याच्या काळात नवनवीन कोसेर्सद्वारे करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. एमबीए, ट्यूरिझमच्या क्षेत्रात अनेक कोसेर्स असून ते पूर्ण करून करिअर घडवता येते. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात एरॉनॉटिकल इंजिनियरिंगला जास्त महत्त्व आले आहे. अॅव्हिएशन कोसेर्सलाही तरुणांची पसंती मिळत आहे. त्यामध्ये फ्लॉईंग ऑपरेशन, एअरक्राफ्ट मेंटेनन्स हे कोर्स आहेत. बँकिंग क्षेत्रात होणारी उलाढाल लक्षात घेता या क्षेत्राला आवश्यक असणारे ज्ञान दिले जाऊ लागले आहे. त्यामध्ये मर्चंड बँकिंग, ट्रेझरी मॅनेजमेंट, मायक्रो अॅण्ड डेव्हलपमेंट फायनान्स, माकेर्टिंग, ह्युुमन रिसोर्स मॅनेजमेंट, इंटरनॅशनल फायनान्स यांचा समावेश आहे.

बिझनेस प्रोसेस आऊटसोसिर्ंगची (बीपीओ) सध्या चलती आहे. त्यासाठी संवाद साधण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय फॅशन डिझाइन, मॉडेलिंग, इंटेरियल डिझाइन, टेक्सटाइल टेक्नॉलॉजी, टेक्सटाइल डिझाइन, फूटवेअर डिझाइन अॅण्ड टेक्नॉलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट, मास कम्युनिकेशन हे कोसेर्स करिअरचे मार्ग खुले करून देऊ लागले आहेत.

- सुजित तांबडे

आजचा दिवस करिअर निवडीचा





ग्लोबलायझेशनमुळे जग खूप जवळ आलं. करिअरचे अनेक ऑप्शन्स ओपन झाले. पण, आजही कित्येकांना करिअरची निवड कशी करायची हे माहित नसतं. हेच लक्षात घेऊन 'मुंबई टाइम्स प्रगती फास्ट'ने करिअर सेमिनारचं आयोजन केलंय. ११ जूनला दुपारी २ वाजता चर्चगेटच्या र्गव्हन्मेण्ट लॉ कॉलेजमध्ये हे सेमिनार होईल.

आपण मराठी पालक आणि मुलं करिअर्स निवडताना नेमके कसे अडखळतो. विशिष्ट ऑप्शनपलिकडे विचारच करत नाही. त्यानिमित्त 'करिअरच्या मैदानातही मराठीच पुढे' याविषयावर प्रसिद्ध कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट वृषाली आठल्ये बोलणार आहेत. इतकंच नव्हे, तर सुरू असलेल्या घाई-गडबडीत करिअर कसं निवडावं यावर ग्रोथ सेण्टरच्या सुचित्रा सुवेर् बोलणार आहेत.

बऱ्याचदा चांगले ऑप्शन, करिअर निवडूनही आथिर्क कुवत नसल्यामुळे आपण मार्ग सोडून देतो. पण, त्यासाठी अनेक बँकांनी, संस्थांनी शैक्षणिक कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. एज्युकेशन लोनवर श्यामराव विठ्ठल को-ऑप. बँकेचे चैतन्य पंडित याविषयावर मार्गदर्शन करतील.

शिवाय या तिन्ही तज्ज्ञांबरोबर आपल्या शंका विचारण्यासाठी उपस्थितांना इण्टरॅक्टिव सेशन्सही आयोजित केलं आहे. त्यातून प्रगतीचा फास्ट ट्रॅक तुमच्यासमोर खुला होईल, हीच अपेक्षा!

AYUSHonline

AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH  adivasi yuva shakti  www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in

AYUSH - warli artsists at "adishilp - 2009" @hyderabad

updation in progress!

our blogs

Loading...

apali prerana