आज आपल्या लोक्कांची ची काय हालत झालीय ..... नाक्यावर गेले तर सगळीं दुकाने, धंदे बाहेरून आलेल्या लोकांचे आहेत .... का आपल्यात काय गुण नाहीयेत काय? आपण काय शिकलेले नाहीत..?? आपण काही करू शाक्त नाही का?
हे बघा आपण पूर्वी व्यवसाय धंदे करत नव्हतो... किवा ते करण्या साठी लागणारे साहित्य, पैसा वैगेरे आपल्या कडे नव्हते.... व्यवसाय कुणी करत नाही म्हणून बाहेरून लोक य्रून त्यांनी व्यवसाय केले.. पैसे कामावले...
काळ बदलात गेला.... बदल झाले.... ते लोक श्रीमंत होत गेले ... पण आपण होतो तिथेच आहोत...
पण आता आपल्या कडे धंद्या साठी लागणारे ज्ञान, पैसे, साहित्य आहे.... पण आपण व्यवसाय, धंदा करू शकत नाहीत.... का कारण ते लोक त्यांचे पाय घटत रोऊन बसलेत... आपल्यान त्यांना उचलून फेकायचे नाहीये.... त्यांना हरवून त्यांच्या पुढे जायचे आहे हे लक्षात ठेवा.... कारण जर तसे केले तर उद्या आणखीन दुसरा कोणी त्याची जागा घेईल..... आणि आपण आहे तिथेच राहू... कोणतीही व्यवसाय , धंदा करण्याची पोकळी आपल्यांना भरून काढता आली पाहिजे...... त्या साठी लागणारे ज्ञान, पैसा, मनुष्य बळ तयार ठेवायला हवे.... जर एखादी व्यवसाय संधी अशेल तर लगेच कामाला लागा... अन्न्यथा आणखीन बहेचे लोक येतील... जर तुम्ही करणार नसाल तर लोक तयारच आहेत.... आणि आपण आणखीन तडीपार व्हाल....
म्हणून... आपल्यांना आता खूप मेहनत करून ह्या सगळ्या बाहेरच्या लोक सोबत स्पर्धा करायची आहे... चला कामाला लागा......
आपल्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा मनापासून विचार करायला हवा..
जर आपण काही करणार नसू तर नाक्कीच आपली पुढील पिढी इथे दिसणार नाही... आपण त्याना संग्रहालयात बघू बहुतेक....
का म्हणून बाहेरची माणसे येऊन पैसे कमावतात... आणि आपण ते का करू शकत नाहीत ....?
काही मुद्य्याचा विचार करूयात...
१. आपली माणसे नकीच त्यांच्या पेक्षा जास्त शिकलेले आहेत...
२. सगळी अधिकारी पदे किवा स्थानिक संस्था आपल्याच लोकाकडे आहेत.
३. जमिनी आपल्याच लोकांच्या आहेत.
४. मनुष्य संख्या आपलीच जास्त आहे.
५. शाश्नाकडून आपल्याला मदत मिळू शकते.
६. आपण इथले स्थानिक आहोत.
वरील सांगितलेले मुदे आपल्या कडे असून सुद्धा बाहेरची मनसे का येतात्त इथे. याच अविचार आपण केलें पाहिजे.
जर त्या लोकांचे बारीक निरिक्षन केले तर पुढील गोष्टी लक्षात येतात.
१. ते जिद्दी असतात. ठरवलेली गोष्ट कोणत्याही परीस्तीत पूर्ण करतात.
२. चिकाटी जास्त असते.
३. काहीही करायला तयार होतात.
४. त्यांच्या लोकात एकता असते.
५. ते लोक एक मेकांना सहकार्य करून राहतात.
६. व्यवहार एके व्यवहार करतात.
७. सगळे सोडून आल्या मूळे मेहनत घेतात.
८. कोणत्याही थराला जायची त्यांची तयारी असते.
९. काम करायला त्यांना कमीपणा वाटत नाही.
वरील सगळ्या गोष्टींचा त्यांना इथे धंदा करण्यां साठी उपयोग होतो....
जर आपण आपल्यात काही बदल करून आणले तर आपण हि नाकीच त्याच्या पेक्षा चांगला धंदा करू शकतो..
सुरवातीला कठीण वाटेल थोडे पण.. सोप्पे काहिक नसते ह्या जगात.... म्हणून पुढे दिलेलेल्या काही गोष्टी जर आपण करू शकलो तर आपले भविष्य नाकीच सावरू शकतो.
१. काम करण्यात कमीपणा वाटवून घेऊ नका.
२. चिकाटीने काम करा.
३. व्यवहारात भावनिक होऊ नका.
४. स्पर्धात्मक राहा.
५. आपल्या लोक्काना सहकार्य करा.
६. नवीन नवीन गोष्टी शिका आणि अवलंब करा, जेणेकरून आपला व्यवसाय अधिक सोप्पा होईल.
७. काळ, वेळे नुसार स्वतःत बदल करून आणा.
८. करणाऱ्या कृतीच्या परिणामाचा विचार करूनच निर्णय घ्या.
९. आपला दृष्टीकोन व्यापक ठेवा.
१०. नवीन व्यवसायाच्या संध्या शोधा.
11. कुणाचीही चांगली गोष्ट तुम्ही शिका आणि तुमच्या साठी वापरा.
जर आपण दिलेल्या गोष्टी केल्यात तर नक्कीच आपण हि व्यवसाय करू शकुत, सध्या हि काही प्रमाणात करतोय पण आपण स्पर्धेत नाहीयेत, आपल्यांना बाहेरून आलेल्या शी स्पर्धा करून त्यांना मागे टाकायचे आहे, आणि दाखवून द्यायचे कि आपली माती मापली माणसे आणि आपलाच आवाज......!!!
आपल्या ला लागणारया रोजच्या वस्तू पासून लक्ष द्या, त्यांच्या जागी आपण का नाही करू शकत.
प्रत्येक बाहेरच्या माणसाशी स्पर्धा करायची तयारी ठेवा. नक्कीच भविष्य आपले अशेल.,.
आपले भविष्य आपल्या तरुण पिढीच्या हातात आहे....
आपल्या समाजात तरुण पिढी आहे त्यांच्या साठी काही गोष्टी .....
१. शिक्षणा कडे फक्त पदवी घेण्यापुरते बघू नका, त्याचा उपयोग रोजचे जीवन सुखकर आणि सोप्पे करण्या साठी उपयोग करा.. नाहीतर शिक्षनाचा काही उपयोग नाही....
२. नवीन नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करा.
३. जगात, आजू बाजूला चालणाऱ्या गोष्टीकडे लक्ष असूद्यात.
४. कुणाशीही स्पर्धा करण्याची तयरी ठेवा.
५. आरक्षणावर अवलंबून राहू नका...
६. सगळ्या गोष्टीत हुशार राहा,
७. पुस्तकी राहू नका.
८. प्रत्येक गोष्ठी साठी पर्याय ठेवा.
९. सगळ्या गोष्टींचे वेवास्तीत नियोजन करा.
१०. आपल्या समाजाला इतर समजा सोबत स्पर्धा करण्या साठी मदत करा.
* वरील सगळे विचार वैक्तिक आहेत... त्याचा कोणत्याही पक्ष किवा संघटनेशी कोणताही संबध नाहीये.... बाहेरचे लोक हा शब्द बिगर आदिवासी साठी वापरला आहे, उद्देश त्यांना हिणवण्याचा नाहीये... पण आदिवासी समजला स्पर्धात्मक बनवण्याचा आहे....
AYUSH - warli artsists at "adishilp - 2009" @hyderabad
updation in progress!
our blogs
Loading...
Click Here To read details~Design By-Adivasi.