ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बहूजन आघाडीच्या उमेदवाराला मदत केल्यावरुन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत कॉ. गोदावरी परुळेकर विचार मंचच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले आहेत. या मारहाणीच्या वेळी मृत कार्यकर्त्याच्या आईसह दोन महिलांना बांधून ठेवण्यात आले होते.
तलासरी तालुक्यातील सावरोली येथे कासूखडकपाडा येथे शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. अनिल भिकल शिंगडा (वय 32) असे मृत्युमुखी पडलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. बहूजन विकास आघाडीचे खासदार बळीराम जाधव यांना परुळेकर विचार मंचच्या कार्यकर्त्यांनी मदत केली होती. मंचचे माजी आमदार रामजी वरठा यांच्या कासूखडकपाडा येथील वाडीत शुक्रवारी आभारप्रदर्शनाची बैठक होती. तर या पाड्यावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे शनिवारी बैठक ठेवण्यात आली होती. त्यावेळी मार्क्सवादी व मंचच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही वेळानंतर मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी अनिल शिंगडा याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्याची आई लहानीबाई व वाली माह्या दाधोडे या महिलेला खांबाला बांधून ठेवण्यात आले होते. अनिल याच्या मदतीला धावलेला त्याचा भाऊ विठ्ठल व विष्णू भेलका यांनाही मारहाण करण्यात आली.
अत्यवस्थ स्थितीत अनिल याला तलासरीतील रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तलासरी तालुक्यात तणाव पसरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मार्क्सवादी कार्यकर्ता नरेश राजाराम शिंगडा याला अटक केली आहे.