ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातील सगळ्यांच              तालुक्यांत दोन दिवस संततधार पाऊस पडत असून बहुतांश ठिकाणी              पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे पालघर तालुक्याचा गावांशी संपर्क तुटला              असून, खवळलेल्या लाटांमुळे स्थानिकांच्या घरात पाणी भरले आहे. महसूल व              पोलिस प्रशासनाने अशा दोनशेहून अधिक कुटुंबाना किनाऱ्यावरुन सुरक्षित              ठिकाणी हलवले आहे. 
गेल्या ३० तासांत              पालघर-डहाणू-तलासरी-विक्रमगड जव्हार तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात              पाऊस पडत असून सुर्या, दहेरजा, वैतरणा, दुधगंगा व तानसा नद्यांना पूर              आला आहे. गेल्या २४ तासात पालघरात १५७ सेमी, डहाणूत २१८.२ सेमी व              तलासरीत १५३ सेमी पावसाची नांेद झाली आहे. पालघर-मनोर मार्गावरील मासवण              येथे सुर्या नदीच्या पुलावरून ८ फूट पाणी जात असून मुंबई, ठाणा,              भिवंडी, नाशिककडे जाणारी वाहतूक बंद पडली आहे. बोईसर औद्योगिक              क्षेत्रालगतच्या सिडको, संजय नगर, महादेव नगर, धोडीपुजा, भयापाडा,              भीमनगरच्या बैठ्या वसाहतींमध्ये बरेच पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.              
पालघरचे तहसिलदार दिलीप संखे व गट विकास अधिकारी राहुल धुम              यांनी किनाऱ्यावरील दांडी गावातील कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलविले              असून आणखी ४० कुटुंबाना उद्या सकाळी हलविण्यात येेणार असल्याचे समजते.              
डहाणू तालुक्यातील घोलवड, वाणगांव, डहाणूखाडी, वाढवण, चिंचणी,              तारापुर, डहाणूदिवादांडी, चंदिका पूल या ठिकाणी पुलावरून पुराचे पाणी              जात असल्याने वाहतूक बंद पडली आहे. तसेच, बोडीर् येथील खोताची खाडी              येथे धुंडीयापाडा व तरीयापाडा येथील ५० घरात पाणी शिरल्याने १३०              स्थानिकांना शारदाश्रम शाळेत तर बोरींगाव येथील मोऱ्याचा पाडा येथे २५              घरात पाणी थिरल्याने ७० स्थानिकांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत              हलविण्यात आल्याचे घोलवड पोलिस ठाण्याचे अधिकारी सुनिल वडके यांनी              सांगितले. 
तलासरी तालुक्यातील समुदकिनाऱ्यावरील झाई गावालाही              पावसाच्या पाण्याबरोबरच समुदाच्या लाटांनी घेरले आहे. २२, २३, व २४              जुलै या तारखांना समुदाच्या उधाणचा धोका संभवत असल्याचा इशाराही              सरकारने दिला आहे.