ग्लोबलायझेशनमुळे जग खूप जवळ आलं. करिअरचे अनेक ऑप्शन्स ओपन झाले. पण, आजही कित्येकांना करिअरची निवड कशी करायची हे माहित नसतं. हेच लक्षात घेऊन 'मुंबई टाइम्स प्रगती फास्ट'ने करिअर सेमिनारचं आयोजन केलंय. ११ जूनला दुपारी २ वाजता चर्चगेटच्या र्गव्हन्मेण्ट लॉ कॉलेजमध्ये हे सेमिनार होईल.
आपण मराठी पालक आणि मुलं करिअर्स निवडताना नेमके कसे अडखळतो. विशिष्ट ऑप्शनपलिकडे विचारच करत नाही. त्यानिमित्त 'करिअरच्या मैदानातही मराठीच पुढे' याविषयावर प्रसिद्ध कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट वृषाली आठल्ये बोलणार आहेत. इतकंच नव्हे, तर सुरू असलेल्या घाई-गडबडीत करिअर कसं निवडावं यावर ग्रोथ सेण्टरच्या सुचित्रा सुवेर् बोलणार आहेत.
बऱ्याचदा चांगले ऑप्शन, करिअर निवडूनही आथिर्क कुवत नसल्यामुळे आपण मार्ग सोडून देतो. पण, त्यासाठी अनेक बँकांनी, संस्थांनी शैक्षणिक कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. एज्युकेशन लोनवर श्यामराव विठ्ठल को-ऑप. बँकेचे चैतन्य पंडित याविषयावर मार्गदर्शन करतील.
शिवाय या तिन्ही तज्ज्ञांबरोबर आपल्या शंका विचारण्यासाठी उपस्थितांना इण्टरॅक्टिव सेशन्सही आयोजित केलं आहे. त्यातून प्रगतीचा फास्ट ट्रॅक तुमच्यासमोर खुला होईल, हीच अपेक्षा!