दहावीच्या परीक्षेत यंदा ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पट्ट्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ५९ सरकारी माध्यमिक आश्रम शाळांपैकी आठ शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. यामुळे शाळांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू तालुक्यांत २१६ माध्यामिक शाळा असून यात ५९ सरकारी आश्रमशाळांचा समावेश आहे. मोखाडा तालुक्यातील अडोशी, गोंडे बुदुक, कोरेगांव तसेच जव्हार येथील कुपोषित बालकांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या वांगणी, विनवल, देहेरे तसेच, विक्रमगड येथील कोन्हे, वाडा तालुक्यातील एक अशा एकूण आठ सरकारी आश्रमशाळांनी १०० टक्के यश मिळविले आहे.
तीन-चार वषेर् या आश्रमशाळांत दहावीचे निकाल शून्य ते २० टक्केच लागत होते. त्यामुळे, कोट्यवधी रुपये खर्चून सरकार आदिवासी मुलांना शिक्षण देत असूनही त्याचा पुरेसा लाभ आदिवासींना मिळत नाही; केवळ कागदी घोडे नाचवले जातात, अशी ओरड होत होती. यंदा मात्र चित्र बदलले. केवळ पाच टक्के शाळांचा निकाल ५० टक्यांच्या खाली आला आहे. त्यातही डहाणू तालुक्यातील धामणगाव येथील आश्रम शाळेचा निकाल २२. ७२ टक्के व रानकोळ येथील आश्रमशाळेचा निकाल ३१.०३ टक्के इतकाच आहे.
इंग्रजी शाळांमध्ये केवळ उत्तीर्ण होणाऱ्या विद्याार्थ्यांनाच दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. मात्र आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांवर अशी सक्ती केली जात नसतानाही आश्रमशाळांनी ही कामगिरी केल्याने या शाळांचे कौतुक होत आहे.
original at -http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4703878.cms