दहावीचा निकाल लागल्याने आता विद्याथीर् आणि पालकांपुढे असलेला प्रश्ान् म्हणजे कुठलं करिअर निवडायचं. ज्या विद्या र्थ्यांना कमी मार्क मिळाले आहेत त्यांनी खचून जाऊ नये. कारण ग्लोबलायझेशनमुळे अनेक करिअर नव्याने उदयाला येत आहेत.
खरंतर या प्रश्ानवर विचार करायची ही योग्य वेळ नाही. झाड चांगलं वाढण्यासाठी लागवड केल्यापासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणूनच शालेय जीवनातच मुलाच्या करिअरचा विचार करायला पाहिजे.
मूल पाचवीत गेल्यानंतर त्याला कुठल्या विषयात रस आहे हे पालकांनी जाणून घ्यावं. दहावी मुलाच्या शैक्षणिक जीवनातला महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होते. म्हणून त्याआधी आपला मार्ग निश्चित करणं आवश्यक आहे.
आपल्या देशात १२० विद्यापीठं आहेत. त्यात चार हजारहून जास्त सीनिअर आणि ज्युनिअर कॉलेजेस आहेत. कमी गुण मिळूनही पॉलिटेक्निकला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वांदे (पू.) इथल्या खेरवाडीमधल्या र्गव्हन्मेण्ट पॉलिटेक्निक कॉलेज हा चांगला पर्याय आहे. बरेच पालक आपली इच्छा मुलांवर लादतात. प्रत्येक पालकाला आपलं मूल इंजिनिअर व्हावं असं वाटत असतं. पण ७० टक्क्यांपेक्षा कमी मार्क असलेल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ नये.
तंत्रज्ञान शाखेची आवड असणाऱ्यांसाठी कम्प्युटर हे क्षेत्र चांगलं आहे. या क्षेत्रात उत्तमोत्तम कोसेर्स आहेत. सध्याच्या काळात नोकरीच्या संधी दुमिर्ळ होत असल्यामुळे कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनी जॉब ओरिएण्टेड करिअर्सचा विचार करावा. मोबाइल रिपेअरिंगमध्येही चांगलं करिअर होऊ शकतं. याबरोबरीने टीव्ही, फ्रीज रिपेअरिंगचेही कोसेर्स चांगले आहेत. हे कोर्स केल्यावर तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता आणि चांगलं अर्थार्जन करू शकता. तसंच आयटीआयचे टेक्निकल कोसेर्सही करता येतील.
ग्रामीण भागातले किंवा शेतीची आवड असणारे विद्याथीर् शेतीमध्ये करिअर करू शकतात. त्यासाठी आज महाराष्ट्रात चांगली कॉलेजेस आहेत. पर्यावरणाची आवड असलेल्यांनी दहावीनंतर सायन्सला प्रवेश घ्यावा. त्यानंतर पाच वर्षं दापोली, राहुटी, परभणी आणि अकोला इथल्या कृषी विद्यापीठात शिक्षण घेता येईल. यात जमिनीची धूप कशी थांबवावी, तिचा कस वाढवणं यासारख्या गोष्टी शिकवल्या जातात. तुम्हाला पर्यावरणाचा एखादा विषय घेऊन रिसर्चही करता येतो.
ज्या विद्यार्थ्यांना कॉमर्समध्ये रस आहे त्यांच्यासाठी 'टॅक्सेशन आणि ऑडिट' हे दोन कोर्स उत्तम आहेत. मुंबईच्या गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये 'टॅक्सेशन आणि ऑडिट'चे चांगले कोसेर्स आहेत. हे कोर्स विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरू शकतील. प्रत्येक व्यवसायात ऑडिटची गरज भासते. त्यामुळे हा कोर्स पूर्ण केल्यावर नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. याशिवाय हे विद्याथीर् स्वत:चा व्यवसायही करू शकतात. तसंच नोकरी करतानाच इन्कम टॅक्स भरणं, सोसायटी किंवा इतर आस्थापनांची अकाऊण्ट्स लिहिणं यासारखी खासगी कामंही करू शकतात. परंतु ही कामं करताना १२ वी नंतर तुम्हाला तीन वर्षांचा अनुभव किंवा बी.कॉम नंतर तीन वर्षांचा अनुभव असायला हवा. त्यामुळे टॅक्सेशनमध्ये चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
ज्यांना आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स अशा शाखांमध्ये फारसा रस नाही त्यांच्यासाठी टेलरिंग, फॅशन डिझायनिंग, फॅशन टेक्नॉलॉजी अशी वेगळी करिअर्सही खुली आहेत. तुमच्याकडे टॅलेण्ट असेल आणि मेहनत घ्यायची तयारी असेल तर या क्षेत्रात स्काय इज लिमिट! तुम्ही स्वत:चा व्यवसाय करू शकता किंवा चांगल्या बुटिकमध्ये नोकरीही करू शकता. सध्या या क्षेत्रांचे खासगी संस्थांचे सहा ते आठ महिन्यांचे विविध कोसेर्स उपलब्ध आहेत. यात तुम्हाला कापडाचा पोत ओळखणं, स्टिचिंग करणं, विणणं, डिझायनिंग करणं यासारख्या गोष्टी शिकायला मिळतात. जोडीला तुमची कल्पकता असल्यास या क्षेत्रात उत्तम यश मिळवता येईल.
जेमॉलॉजी हेही चांगलं करिअर म्हणून उदयाला येतंय. प्राचीन काळापासून माणसाला हिऱ्याचं, खड्याचं आकर्षण आहे. त्यामुळे जगभरात अनेक वर्षांर्पासून रत्नांचा व्यापार सुरू आहे. यामध्ये हिऱ्याला पैलू पाडण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि कौशल्याचा भाग असतो. दहावीनंतर या क्षेत्राची आवड असलेले विद्याथीर् हे कोसेर्स करू शकतात. त्याचा कालावधी साधारणत: सहा महिन्यांचा असतो.
ज्यांना मेडिकल किंवा इंजिनिअरिंगमध्ये आवड नाही ते विद्याथीर् जेनेटिक्स किंवा सायकोलॉजी घेऊन एम.एस्सी. करू शकतात. एम.एस्सी. क्लायमेट किंवा पर्यावरण यासारखे वेगळे पर्यायही उपलब्ध आहेत. तसंच तुम्हाला आवड असल्यास बोटीवर खलाशी म्हणूनही जाऊ शकता.
याखेरीज जाहिरात, कला, फोटोग्राफी, डिझायनिंग, कार डिझायनिंग, पत्रकारिता, कलाशाखा, इतिहास, भूगोल, मानसशास्त्र किंवा अर्थशास्त्र यासारखे करिअरचे वेगळे पर्याय आहेतच. ऑल द बेस्ट!
- किरण जोग (लेखक करिअर कौन्सेलर आहेत)
|
|