- कविता कर्वे
प्रिन्सिपॉल, आयएफएफएस
बिलबाँग हाय स्कूल,
ठाणेच्या माजी प्रिन्सिपॉल
पूर्वी बोर्डिंग स्कूलमध्ये शिकायला जाणारी मुलं ठराविक वर्गातली असायची. आज रेसिडेन्शियल आणि डे-स्कूल्सची मागणी वाढत आहे. शाळेत मुलाच्या अभ्यासाबरोबरीने त्याची आवड लक्षात घेऊन त्यानुसार त्याला एखादी कला किंवा खेळ शिकवले जातात. रेसिडेन्शिल स्कूलची संकल्पना बोर्डिंग स्कूलवर आधारित असली तरी दोघांमध्ये मूलभूत फरक आहे. रेसिडेन्शियल स्कूल शहराच्या धकाधकीपासून दूर असली तरी शहरापासून लांब नसतात. कर्जतमध्ये 'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' हे असंच एक रेसिडेन्शियल स्कूल सुरू होत आहे.
.......
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, Values are not taught but caught. जीवनमूल्यं ही शिकवता येत नाही, ती आत्मसात करावी लागतात. ही म्हण खरी असली तरी पूर्णसत्य नाही. जीवनमूल्यं शिकवता येत नाही ही गोष्ट खरी आहे पण जीवनमूल्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र शिकवावा लागतो. मूल जन्माला येतं त्यावेळी त्याला भल्याबुऱ्याची जाण नसते. चांगल्या-वाईट गोष्टी शिकवण्याचं काम हे आई-वडिल आणि गुरुजनांचं असतं.
कर्जतमध्ये नव्याने सुरू होत असलेल्या 'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' या रेसिडेन्शियल स्कूलचा मुख्य उद्देशच मुलांना व्यापक दृष्टिकोन देण्याचा आहे. यामुळे त्यांच्या शाळेचं घोषवाक्यच 'वसुधैव कुटंुबकम्' असं आहे. याचाच अर्थ संपूर्ण विश्व आपल्या कुटुंबाप्रमाणे असून त्याच्या हिताचाच विचार आपल्याकडून व्हायला हवा. शाळेबद्दलची अधिकाधिक माहिती पालकांना मिळावी यासाठी ठिकठिकाणी सेमिनार्सचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची माहिती खाली दिली आहे.
'इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन' या शाळेच्या उभारणीमध्ये भानुशाली कुटंुबाचं फार मोठं योगदान आहे. शाळेचे मॅनेजिंग ट्रस्टी पी. सुब्रमण्यम यांचाही शाळेच्या उभारणीमध्ये मोठा सहभाग आहे.
शाळेची उद्दिष्ट्य :
आजचे पालक करिअर ओरिएण्टेड असल्यामुळे त्यांच्याकडे आपल्या मुलाला देण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांचा प्रश्ान् सतत त्यांना भेडसावत असतो. करिअर करताना त्यांचं अर्धं लक्ष शाळा आणि पाळणाघरात असणाऱ्या मुलाकडे असते. मुलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार वाढत असल्याने मुलांविषयी त्यांना सतत काळजी वाटत असते. म्हणूनच आजच्या पालकांसाठी रेसिडेन्शियल स्कूल्स फायदेशीर ठरत आहेत.
या शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रमाचा शिकवला जातो. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित असते. या शाळेमध्ये अभ्यासाबरोबर मुलांच्या सर्वांगिण विकासावरही भर दिला जातो. मुलाच्या आवडीची कला, खेळ यामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं जातं. यामध्ये मुलाची आवड लक्षात घेतली जाते. इथे मूल स्वावलंबी होतं. तसंच त्याच्यामधले नेतृत्त्वगुण वाढीला लागतात.
शाळेची वैशिष्ट्य:
इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन ही शाळा 'को-एडेड' आहे. या शाळेत आयसीएसई अभ्यासक्रम प्रस्तावित आहे. मुलांच्या मनात परीक्षेची भीती निर्माण होऊ नये म्हणून प्राथमिक वर्गांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. त्याऐवजी मुलांची नियमित चाचणी केली जाईल. त्याविषयीचं दडपण मुलांना येऊ नये याचीही काळजी घेतली जाईल. मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
शाळेमध्ये मुलांना शिकवली जाणारी जीवनमूल्यं,
० जगा आणि जगू द्या.
० आपल्याबरोबरच्या विद्यार्थ्यांशी सलोख्याने वागा.
० एकजुटीने राहा.
० प्रेम, सत्य आणि सहिष्णुतेचं महत्त्व जाणा.
शाळेचं वेगळेपण :
रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मुलं शिस्तबद्ध, स्वावलंबी होतात. पण बरेचदा हे गुण त्यांना कुटुंबापासून दूर नेतात. इंडिया र्फस्ट फाऊण्डेशन मात्र मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये दुवा बनण्याचं काम करेल. मुलामध्ये घरची ओढ टिकून राहण्यासाठी महिन्यातून एकदा मुलाला पालकांसोबत शेवटच्या शुक्रवारी संध्याकाळी घरी जाता येईल. आज विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांना आजी-आजोबांची माया मिळत नाही. इंडिया र्फस्ट फाऊण्डेशनने आपल्या आठवड्याच्या कार्यक्रमांमध्ये खास आजी-आजोबांसाठी तास राखून ठेवला आहे.
वर्गातल्या एका मुलाच्या आजीआजोबांना आठ ते दहा दिवस शाळेत राहता येईल. त्या दिवशी आजीआजोबा आपल्या नातवंडासोबत तसंच त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत एक दिवस घालवतील. त्यांना गोष्टी सांगतील. गाणी, स्तोत्रं शिकवतील. आजी-आजोबांना इथे फक्त येण्याचा खर्च करावा लागेल. त्यांच्या राहण्याचा, जेवण्याखाण्याचा खर्च करावा लागणार नाही.
मुलांना देशातल्या तसंच परदेशातल्या कला शिकवण्यासाठी 'ग्लोबल व्हिलेज' उभारण्यात आलं आहे. मेडिटेशन, योग शिकण्यासाठी खास सेण्टर उभारलं आहे. विश्वातल्या प्रत्येक देशातल्या मान्यवरांविषयी माहिती देण्यासाठी 'हॉल ऑफ फेम'ची योजना करण्यात आली आहे. याशिवाय मुलांसाठी अद्ययावत सोयींनी सुसज्ज असं हॉस्टेलही बांधण्यात आलं आहे.
प्रत्येक मूल हे खास असतं. त्याची स्वत:ची ओळख असते. मुलामधली निरागसता न घालवता त्याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून घडवण्याचा वसा इंडिया र्फस्ट फाऊण्डेशनने घेतला आहे. मुलामध्ये 'ए' अॅम्बिशनचा, 'बी' ब्रेव्हरीचा आणि 'सी' कॉन्फिडन्सचा रुजवण्यात शाळेला यश येईल हे मात्र निश्चित.
- कुमुद इतराज