भाईंदरजवळ उत्तनच्या निसर्गरम्य परिसरात 'केशवसृष्टी' वसली आहे. केशवसृष्टीच्या विविध उपक्रमांपैकी रामरत्ना विद्य
ा मंदिर एक आहे. अभ्यासाबरोबर मुलाचा मानसिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी आवश्यक असणारे उपक्रम शाळेत आहेत.
बरेच पालक आपापल्या करिअरमध्ये व्यस्त आहेत. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे सर्वांच्याच घरात आजी-आजोबा असतीलच असं नाही. ती जबाबदारी आजच्या रेसिडेन्शियल स्कूल्सनी उचलली आहे. रेसिडेन्शियल स्कूलची संकल्पना नवीन नाही. फक्त आजच्या काळात त्याची गरज जास्त आहे. बोडिर्ंग स्कूलसारखीच ही रेसिडेन्शियल स्कूल्स असतात. बोडिर्ंग स्कूल्स हिल स्टेशनवर, घरापासून लांब असायची. परंतु रेसिडेन्शिअल स्कूल मंुबईतल्या ताणतणावांनी भरलेल्या वातावरणापासून दूर, निसर्गरम्य ठिकाणी असली तरी शहरापासून खूप लांब नाहीत.
रामरत्ना विद्या मंदिरविषयी मुख्याध्यापिका अनिता साहू यांनी अधिक माहिती दिली, 'मुलं मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. आपण संस्कार देऊ तशी ती घडतात. ही जबाबदारी पालकांबरोबर शाळेची आणि शाळेल्या शिक्षकांची असते. रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मुलं शाळेतच राहत असल्यामुळे जबाबदारी जास्त असते. शिक्षकांनाच दोन्ही भूमिका पार पाडाव्या लागतात. आपल्या देशाची ही भावी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावी याचा विचार करूनच अभ्यासाबरोबर इथली दिनचर्या आखली जाते. अभ्यासाबरोबर आम्ही मुलाच्या मनात देशप्रेमही जागृत करतो. शाळेला यंदा बारा वर्षं पूर्ण झाली. आमच्या पहिल्या बॅचचा विद्याथीर् परदेशात उच्चशिक्षण घेऊन भारतात परतला आहे.'
शाळेचा परिसर तीस एकरमध्ये पसरला असून त्यात शाळा, हॉस्टेल, स्वीमिंग पूल, मेस, सात बेडचं हॉस्पिटल आणि मैदान आहे. शाळा चौथी ते बारावीपर्यंत आहे. शाळेत सीबीएससी अभ्यासक्रम आहेत. शाळेने गुरूशिष्य परंपरा जपली आहे. मुलांवर वैयक्तिक लक्ष ठेवता यावं यासाठी दहा मुलांमागे एक शिक्षक नेमला आहे.
सकाळी साडेपाच वाजता मुलांचा दिवस सुरू होतो. सकाळच्या प्रार्थनेत मुलांना स्तोत्रं शिकवली जातात. त्यानंतर योगासनं होतात. व्यायामानंतर आंघोळ करून, ब्रेकफास्ट घेऊन मुलं शाळेसाठी तयार होतात.
रोज संध्याकाळी खेळासाठी अर्धा तास राखून ठेवला जातो. या तासामध्ये मुलांना स्वीमिंग, कराटे, बास्केट बॉल असे बारा खेळ शिकवले जातात. शाळा संपल्यावरही मैदानी खेळासाठी एक तास राखीव ठेवला जातो. रात्रीच्या जेवणानंतर मुलांसाठी संस्कार वर्ग असतो. त्यानंतर अभ्यास, वर्तमानपत्र वाचन आणि टीव्ही पाहण्यासाठी एक तास असतो. स्वत:चे बूट पॉलिश करणं, दुसऱ्या दिवशीची तयारी तसंच आपलं कपाट व्यवस्थित आणि नीटनेटकं ठेवणं यातून मुलांना स्वावलंबनाचे धडे दिले जातात. रात्री दहाला मुलांचा दिवस संपतो. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मुलं घरी जातात. शाळेला गुरुवारी सुट्टी असते. महिन्यातून एका रविवारी पालकांची मीटिंग असते.
शिक्षकांनाही खास प्रशिक्षण दिलं जातं. शाळेचे चेअरमन महेंदा काबरा आणि व्हाइस चेअरमन अरविंद रेगे हे प्रशिक्षण देतात. अभ्यासामध्ये कमी गती असलेल्या विद्यार्थ्यांची वर्षभरामध्ये प्रगती होऊन ते साठ आणि सत्तर टक्क्यांपर्यंत ते मार्क मिळवतात. गेली पाच वर्षं शाळेला 'बेस्ट स्कूल'चं पारितोषिक मिळालं आहे.
- प्रतिनिधी