दहावीच्या परीक्षेत खणखणीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे! आयुष्यातील हा महत्त्वाचा टप् पा ओलांडतानाचा त्यांच्या यशाचा फंडा आणि पुढच्या महत्त्वाकांक्षा, याविषयी त्यांच्याच शब्दांत...
* अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचेय ९० टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळतील, असे वाटत होतेच परंतु, मुंबईतून पहिला क्रमांक आल्यावर मात्र, आश्चर्याचा धक्का बसला आहे. या यशाचे मानकरी शिक्षक, आई-वडील आणि आजी आहे. मला चौथी आणि सातवीची स्कॉलरशीप, होमी भाभा सायन्स टॅलेन्ट हंट स्पधेर्तल्या ज्युनिअर्सच्या गटात सुवर्ण तर सिनिअर्सच्या गटात रौप्यपदक मिळाले आहे. अकरावीसाठी मी ठाण्याच्याच एम. एच. हायस्कूलला प्रवेश घेणार आहे. नंतर आयआयटीला अॅडमिशन घेऊन मला अॅरॉनॉटिकल इंजिनीअर व्हायचे आहे. - सोनाली चव्हाण, (९६.४६ टक्के) सरस्वती सेकंडरी, ठाणे, मुंबई विभागातून पहिली
* ध्यास इंजिनीअरिंग, आयएएसचा दहावीच्या परीक्षेचे टेंन्शन न घेता मी नियोजन करून अभ्यास केला. वर्षभर शाळेतील स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेत खूप मजा केली. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि स्पेशल बॅचेसमुळे हे यश मिळाले. मला भरतनाट्यमची आवड आहे. मला मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. आयआयटीतून इंजिनीअर व्हायचे आहे. नंतर आयएएसही करायचे आहे. - शेफाली माडदोळकर,(९६.३०) सरस्वती विद्यालय, ठाणे, मुंबई विभागातून दुसरी
* मेडिकलपेक्षा इंजिनीअरिंग आवडते माझे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर, तर आई आणि मोठा भाऊ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर त्यामुळे मलाही इंजिनीअर व्हायचे आहे. मला बायोलॉजी विषय आवडत नसल्याने मेडिकलला जाण्यापेक्षा कॉम्प्युटर इंजिनीअर व्हायला आवडेल. माझ्या यशाचे श्रेय शाळेतले शिक्षक, कुटुंबियांना द्यायला हवे. मला अभ्यासात रमायला आवडते, पण चित्रकला, हस्तकलेचेही वेड आहे. सातवीत स्कॉलरशीप मिळाली होती. काही महिन्यांपूवीर् शाळेकडून 'बेस्ट गर्ल' ट्रॉफी मिळाली. मला एम. एच. हायस्कूलला प्रवेश घ्यायचा आहे. - तेजल प्रधान, (९६.१५) ए. जे. जोशी, ठाणे, मुंबई विभागातून तिसरी
* वेळापत्रक तंतोतंत पाळले वर्षभर केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेचे ओझे वाटले नाही. वडिलांनी तयार केलेले दिवसभराचे वेळापत्रक, खासगी ट्यूशनमध्ये घेतलेला सततचा सराव आणि शाळेतील शिक्षकांचे मागदर्शन या त्रिसुत्रीमुळे हे यश मिळाले. कंटाळा येऊ नये म्हणून दररोज वेळापत्रक बदलले जात होते. आता पुढे इंजिनीअरिंग करायचे आहे. - मृण्मयी जाधव, (९६.१५) सुळे गुरूजी विद्यालय, हिंदू कॉलनी, मुलींमध्ये तिसरी व शाळेत पहिली.
* यश अभ्यासावर ठरते, शाळेवर नाही! दोन वर्षापूवीर् आम्ही कल्याणहून माहीमला आलो. दादर, माहीम भागांतील एकाही शाळेत प्रवेश न मिळाल्याने रात्रशाळेचा पर्याय निवडला. रात्रशाळेत चांगले शिक्षण मिळत नाही, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. शाळा चांगली किंवा वाईट नसते. आपण अभ्यास कसा करतो, यावर बरेच अवलंबून असते. संध्याकाळी सातला शाळा सुटल्यानंतर रात्री थोडा वेळ अभ्यास, पहाटेच्या वेळी तीन तास नियमित अभ्यास, असे माझे अभ्यासाचे वेळापत्रक होते. हायकोर्टात अॅडव्होकेट असलेल्या वडिलांची आणि रात्रशाळेतील शिक्षकांची साथ मिळाल्यामुळेच हे यश मिळवू शकले. मला कम्प्युटर इंजिनीअरिंग किंवा मेडिकलमध्ये करिअर करायचे आहे. चांगल्या कॉलेजला प्रवेश घेऊन आता सीईटी आणि बारावीच्या अभ्यासावर लक्ष केंदित करायचे आहे. - सोनल सिंग, (८४.१५) कनोसा नाईट हायस्कूल, रात्रशाळेत राज्यातून पहिली
* स्वप्न आयआयटी इंजिनीअर होण्याचे दहावीचा उगाचच बाऊ केला जातो. नियमित अभ्यासाबरोबर खेळालाही महत्त्व द्यावे. अभ्यासातील सातत्य मात्र कमी होऊ न दिल्यास यश तुमचेच आहे. मला वाचनाची आवड आहे. परीक्षेच्या काळात आई हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती. मी सुरुवातीला दोन-तीन तास अभ्यास करायचो, मात्र नंतर हा वेळ वाढवत गेलो व खेळाचा वेळ कमी करीत गेलो. खेळात कधी खंड पडू दिला नाही. मला आयआयटी इंजिनीअर व्हायचे आहे. - संकेत पाटील, (९६.३०) सेंट अँथनी काँन्व्हेंट, वसई, मुंबई विभागातून दुसरा
* आता आयआयटी, मग आयएएस! वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचे नियोजन केले होते. सुरुवातीला एक दोन तास अभ्यास सुरू होता. मग, पाच-सहा तास आणि नंतर दहा ते बारा तास. क्रिकेट सामने पाहिले, पण टीव्हीमुळे डोळ्यांवर ताण पडू नये म्हणून मालिका आणि मनोरंजाचे सर्व कार्यक्रम बंद होते. मोटारींचे फोटो जमवण्याचा मला छंद आहे. या यशाचे सर्व श्रेय आई वडिल व कोचिंग क्लासला आहे. भविष्यात आयआयटीतून सिव्हिल इंजिनीअरिंग करून पुढे आयएएस व्हायचे आहे. खूप मेहनत करून फोटोतली रोल्सरॉइस फँटम विकत घेण्याचे स्वप्न आहे. - नवनीत मेहरोल, (९४.६१) सुळे गुरुजी विद्यालय, अपंगांमध्ये पहिला.
* पप्पांचे स्वप्न साकार करायचेय डोळ्यांत अश्ाू असतील तर पुढचा मार्ग नीट दिसत नाही. त्यामुळे अश्ाू पुसून आपल्या ध्येयावर लक्ष्य केंदित करावे, असे पप्पा नेहमी सांगत. दहशतवाद्यांशी लढताना पप्पा शहीद झाल्यानंतर या शिकवणीचे अनुकरण करणे खूप अवघड होते. त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी मी अभ्यासावर लक्ष केंदित केले. दहावीतील हे यश वडिलांच्या त्या शिकवणीमुळेच शक्य झाले. आता डॉक्टर होऊन त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे. सांत्वन करण्यासाठी घरी लोकांची सतत ये-जा होती. त्यामुळे शेजाऱ्यांच्या घरी बसून अभ्यास केला. आई आणि बहिणीसोबतच मला शाळेतील शिक्षकांचे पाठबळ मिळाले. हा आनंदाचा क्षण पाहायला पप्पा नाहीत, याची मात्र खंत वाटते. - निवेदिता शशांक शिंदे, (८६) प्रभादेवी कॉन्व्हेंट र्गल्स हायस्कूल
* अभ्यास-आहाराचे वेळापत्रक सांभाळा क्लास-शाळा-क्लास आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास, असे माझे वेळापत्रक होते. या वेळा सांभाळताना माझे आहार आणि झोपेकडे दुर्लक्ष झाल्याने परीक्षा महिन्याभरावर आली असताना सारखी झोप यायची. त्यामुळे अभ्यासात व्यत्यय यायचा. मग मी वेळापत्रक बदललेे. प्रिलिम्समध्ये ९४ टक्के मिळाले तेव्हाच ९५ टक्क्यांच्या पुढे जाण्याचा निश्चय केला होता. या यशात माझ्या खाण्याचे वेळापत्रक पाळणारी आई, अभ्यास करताना माझ्याबरोबर उशिरापर्यंत जागणारे बाबा, धाकटा भाऊ आणि शाळा-क्लासमधील शिक्षकांचा वाटा आहे. मी फक्त अभ्यास एके अभ्यास करायचे, बाकीच्या गोष्टी या सगळ्यांनी सांभाळल्या. शाळेतील एक व्हॉलीबॉलची मॅच सोडली तर मनोरंजनाच्या सगळ्या माध्यमांपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. जानेवारीत शाळा बंद झाल्यानंतरचा अखंड दिवस क्लास आणि घरी अभ्यास करण्यातच जायचा. - अंजली जाधव, (९५.८४), अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, गोरेगाव, मुंबईत मागासवगीर्यातून प्रथम
|
|